सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिसेंबर 2025 महिन्यासाठी ग्रामीण,शहरी आणि संयुक्त क्षेत्रांसाठी आधार वर्ष 2012 = 100 नुसार ग्राहक किंमत निर्देशांक


सलग सातव्या महिन्यात अन्नधान्य चलनवाढीचा दर नकारात्मक राहिला

प्रविष्टि तिथि: 12 JAN 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026

ठळक वैशिष्ट्ये

1. प्रमुख चलनवाढ : डिसेंबर 2025 या  महिन्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित वर्ष-दर-वर्ष चलनवाढीचा दर डिसेंबर 2024 च्या तुलनेत 1.33% (तात्पुरता) आहे. नोव्हेंबर 2025 च्या तुलनेत डिसेंबर 2025 च्या प्रमुख चलनवाढीत 62 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे.

2. खाद्यान्न  चलनवाढ : डिसेंबर  2024 च्या तुलनेत डिसेंबर  2025 महिन्यात अखिल भारतीय ग्राहक अन्न किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर  -2.71%  (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी संबंधित चलनवाढीचा दर अनुक्रमे - 3.08% आणि  -2.09% आहे. नोव्हेंबर  2025 च्या तुलनेत डिसेंबर   2025 मध्ये खाद्यान्न महागाईत 120  बेसिस पॉइंट्सची वाढ  दिसून आली आहे. गेल्या 13 महिन्यांतील सीपीआय (सामान्य) आणि सीएफपीआयसाठी अखिल भारतीय चलनवाढीचा दर खाली दिला  आहे.

...डिसेंबर 2025 मध्ये प्रमुख महागाई आणि खाद्यान्न  चलनवाढीत  झालेली वाढ प्रामुख्याने वैयक्तिक निगा  आणि परिणाम, भाज्या, मांस आणि मासे, अंडी, मसाले आणि डाळी आणि उत्पादनांच्या दरातील  वाढीमुळे झाली आहे.

...ग्रामीण महागाई दर: डिसेंबर 2025 मध्ये ग्रामीण क्षेत्रातील प्रमुख आणि अन्न महागाईत वाढ दिसून आली.

... शहरी महागाई दर: शहरी क्षेत्रातील प्रमुख महागाई दर नोव्हेंबर 2025 मधील 1.40% वरून वाढून   डिसेंबर  2025 मध्ये 2.03% (तात्पुरता ) इतका राहिला.

... गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई दर: डिसेंबर  2025 मध्ये वार्षिक आधारावर गृहनिर्माण महागाई दर 2.86%(तात्पुरता) राहिला . नोव्हेंबर  2025 मध्ये संबंधित महागाई दर 2.95% होता. गृहनिर्माण निर्देशांक केवळ  शहरी क्षेत्रासाठी संकलित केला आहे.

 ..  शिक्षण महागाई दर: डिसेंबर  2025 मध्ये वार्षिक आधारावर शैक्षणिक महागाई दर  3.32%  (तात्पुरता) राहिला .

... आरोग्य महागाई दर : डिसेंबर 2025 मध्ये वर्ष-दर-वर्ष  आरोग्य महागाई दर 3.43%(तात्पुरता) राहिला.

 .... डिसेंबर 2025  मध्ये वर्ष-दर-वर्ष उच्च चलनवाढीचा दर असलेली पाच प्रमुख राज्ये खालील आलेखात दाखवली आहेत:

.... प्रतिसाद दर -  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या एनएसओ अर्थात क्षेत्रीय विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1114 शहरी बाजारपेठा व 1181 गावे यांतून किंमतींविषयी साप्ताहिक आधारे माहिती गोळा केली जाते. डिसेंबर  2025 मध्ये एनएसओने 100% गावे व 98.6% शहरी बाजारांतून किंमती संकलित  केल्या; ग्रामीण बाजारासाठी नोंदविलेल्या बाजारनिहाय किमती 89.36% व शहरीसाठी  92.17% होत्या.

... नोव्हेंबर 2025 च्या सीपीआयच्या प्रसिद्धीची तारीख 12 डिसेंबर 2025 (शुक्रवार) किंवा 12 तारखेला सुट्टी असल्यास पुढील कामकाजाचा दिवस आहे. अधिक माहितीसाठी www.cpi.mospi.gov.in किंवा esankhyiki.mospi.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या.

V.आधार 2012=100 साठी सीपीआयचे हे शेवटचे प्रसिद्धिपत्रक आहे.आधार  2024=100वरील सुधारित सीपीआय मालिका 12 फेब्रुवारी 2026 (गुरुवार) रोजी किंवा 12 तारखेला सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी प्रसिद्ध केली जाईल.   

पीडीएफ साठी इथे क्लिक करा.

निलीमा ‍चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2213946) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी