विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एरोसोल्सच्या तुलनेत बाष्प अधिक जास्त प्रमाणात वाढवते वातावरणाचे तापमान: नवीन संशोधनाचा निष्कर्ष

प्रविष्टि तिथि: 08 JAN 2026 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026

एरोसोल्स आणि बाष्प( पाण्याची वाफ)  यांच्या एकत्रित भूमिकेतून हवामान बदलावर होणारे परिणाम एका नवीन संशोधनातून समोर आले आहेत. हवामानाचे अचूक अंदाज आणि भविष्यातील अंदाजांसाठी एरोसोल्स आणि बाष्प या दोन्ही घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यातील परस्पर क्रियेचा प्रादेशिक वातावरणीय गतिशीलता आणि भारतीय मान्सूनवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडू शकतो.

एरोसोल्स आणि बाष्पाचे उत्सर्जन तथा प्रारण  परिणाम  पृथ्वीचे किरणोत्सर्ग संतुलन आणि हवामानाची गतिशीलता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे परिणाम जागतिक तापमान, हवामानाचे स्वरूप आणि हवामान स्थैर्य यावर परिणाम करतात. सौर ऊर्जा शोषून किंवा विखरून एरोसोल्स, बाष्पाचे ढग, हरितगृह वायू पृथ्वीच्या ऊर्जेवर कशा प्रकारे प्रभाव टाकतात, याची माहिती या उत्सर्जन परिणामांच्या संशोधनातून मिळते.

भारतीय-गंगीय पठाराचा (इंडो गँजेटिक प्लेन-IGP) प्रदेश हा एरोसोल लोडिंगसाठी जागतिक 'हॉटस्पॉट' मानला जातो. येथे बाष्प आणि एरोसोल्सच्या प्रमाणात उच्च अवकाश-तापमानविषयक विविधता आढळते, ज्यामुळे त्यांच्या हवामानविषयक प्रतिसादाचे अचूक मोजमाप करणे आव्हानात्मक आणि अनिश्चित होते. IGP आणि आसपासच्या प्रादेशिक हवामानातील बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी एरोसोल लोडिंग आणि बाष्पाचे प्रारण परिणाम  यांच्यातील संबंधांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

आकृती 1:

इंडो–गंगा मैदान प्रदेशातील निरीक्षण स्थळांचे स्थान (वरचा डावा कोपरा); एरोसोल्समुळे होणाऱ्या किरणीय फोर्सिंगचे अंदाज (a) आणि जलवाष्पासह (b) तसेच एरोसोल्सशिवाय (c), तसेच कानपूरमधील उष्मन दर (d) — सिंगल स्कॅटरिंग अल्बेडोच्या मूल्यांच्या चार अंतरालांसाठी (वरचा उजवा कोपरा).

कानपूरसाठी PWV (सेमीमध्ये) नुसार गटबद्ध केलेला एक्स्टिंक्शन ऑंग्स्ट्रॉम घातांक (EAE) विरुद्ध EAE मधील फरक (खालचा डावा कोपरा) आणि EAE₄₄₀–₈₇₀ विरुद्ध AAE₄₄₀–₈₇₀ यांचा स्कॅटर प्लॉट, जो कानपूरवरील विविध एरोसोल प्रकार दर्शवतो (खालचा उजवा कोपरा).

नैनीताल येथील 'आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस'(एरीज) आणि बेंगळुरू येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स'  या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत  कार्यरत स्वायत्त संस्थांनी, ग्रीसमधील कोझानी येथील वेस्टर्न मॅसिडोनिया विद्यापीठ आणि जपानमधील टोक्यो येथील सोका विद्यापीठाचे तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांसह हे संशोधन केले आहे. इंडो-गॅंजेटिक प्लेन (IGP) मधील सहा 'एरोनेट' केंद्रांवरील डेटा आणि 'SBDART' मॉडेलचा वापर करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

एरीज मधील डॉ. उमेश चंद्र दुमका आणि आयआयए मधील डॉ. शांतीकुमार एस. निंगोमबम यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न मॅसेडोनियाचे दिमित्रीस जी. कास्काउटिस, आर.ई.पी. सोतिरोपौलौ आणि ई. टागारिस तसेच सोका युनिव्हर्सिटीचे डॉ. प्रदीप खत्री यांच्यासह हे संशोधन केले. त्यांनी संपूर्ण इंडो-गॅंजेटिक प्लेन  प्रदेशातील सहा AERONET (एरोसोल रोबोटिक नेटवर्क - एरोसोलच्या गुणधर्मांचे मोजमाप करणाऱ्या जमिनीवर आधारित 'सन फोटोमीटर्स'चे आंतरराष्ट्रीय नेटवर्क) केंद्रांमधील डेटाचा वापर केला आणि सांता बार्बरा डिसॉर्ट ॲटमॉस्फेरिक रेडिएटिव्ह ट्रान्सफर मॉडेल वापरून प्रारण संक्रमण सिम्युलेशन  कार्यान्वित केले.

या डेटाच्या मदतीने दाट लोकवस्तीच्या आणि अत्यंत प्रदूषित इंडो-गॅंजेटिक प्लेन  प्रदेशातील एरोसोल लोडिंग आणि बाष्पाचे प्रारण परिणाम  यांच्यातील संबंधांचे विश्लेषण करताना संशोधकांना असे आढळले की, वातावरणातील उष्णतेवर  एरोसोल्सपेक्षा बाष्पाचा प्रभाव अधिक असतो.

ऍटमॉस्फेरिक रिसर्च जर्नल' मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, बाष्पाचे प्रारण परिणाम  हे एरोसोल्सच्या अस्तित्वामुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. एरोसोल आणि बाष्प यांच्यातील आंतरक्रिया वातावरणातील प्रारण प्रमाणाचे नियमन करतात; यामध्ये एरोसोलयुक्त वातावरणाच्या तुलनेत एरोसोल-मुक्त  वातावरणात बाष्पाचे प्रारण परिणाम अधिक तीव्र असल्याचे आढळले आहे.

जेव्हा हवा स्वच्छ असते (म्हणजेच जेव्हा एरोसोल्सचे प्रमाण कमी असते), तेव्हा हे परिणाम पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि वातावरणात अधिक शक्तिशाली असतात. मात्र, जेव्हा वातावरणात एरोसोल्स उपस्थित असतात, तेव्हा बाष्पाचा  प्रभाव वातावरणाच्या वरच्या थरात अधिक प्रकर्षाने जाणवतो; जो एरोसोल्स आणि बाष्प यांच्यातील महत्त्वपूर्ण परस्परसंबंध अधोरेखित करतो.

या अभ्यासात असेही आढळले आहे की, एरोसोल्सच्या तुलनेत बाष्प वातावरण अधिक प्रमाणात तापवते. हे इंडो-गॅंजेटिक मैदानावरील हवामानावर प्रभाव टाकण्यामध्ये बाष्पाची असलेली मुख्य भूमिका स्पष्ट करते. हे निष्कर्ष सौर स्थिती  आणि एरोसोल शोषणाशी संबंधित वातावरणीय चल घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, ज्यातून हवामानावर होणारे परिणाम निश्चित करण्यात एरोसोल्स आणि बाष्प यांची एकत्रित भूमिका उलगडते.


नेहा कुलकर्णी /शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2212940) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी