संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतची मार्गदर्शिका' केली प्रकाशित

प्रविष्टि तिथि: 23 DEC 2025 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 डिसेंबर 2025

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) तयार केलेल्या 'रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यावरील मार्गदर्शिकेचे प्रकाशन केले. बीआरओ, देशातील काही अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये महामार्ग आणि मोक्याच्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल करत  असून, डीपीआर हे अभियांत्रिकी डिझाइन, बांधकाम पद्धती, अंमलबजावणी धोरण, गुणवत्ता नियंत्रण आणि खर्च विश्लेषण यांचा सर्वसमावेशक दस्तऐवज म्हणून काम करते.

डीपीआर तयार करण्यासाठी तपशील, मानके, मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रियांचा समावेश असलेला एक संक्षिप्त, व्यापक आणि एकसमान संदर्भ प्रदान करण्यासाठी बीआरओने मार्गदर्शिका  विकसित केली आहे. प्रकल्प उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर, मग ते नवीन बांधकाम असो किंवा सध्या वापरात असलेल्या रस्ते पायाभूत सुविधांची श्रेणी सुधारणा असो, अभियंत्यांना सहाय्य करणे, हा यामागील हेतू  आहे.

अपुऱ्या माहितीच्या डीपीआरमुळे, होणारा वेळ आणि खर्चाचा अपव्यय, यासारख्या समस्यांचे निराकरण करणे हे या मार्गदर्शिकेचे उद्दिष्ट आहे. यामुळे अहवालांची गुणवत्ता आणि सातत्य लक्षणीयरीत्या सुधारून प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित होईल, आणि पद्धतशीर नियोजन, तांत्रिक अचूकता, गुणवत्तेची हमी आणि किफायतशीरपणा, याद्वारे सीमावर्ती प्रदेशातील धोरणात्मक कनेक्टिव्हिटीमधील सुधारणा आणि सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर, सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन, यांच्यासह इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207777) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , हिन्दी