पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2025 11:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांची आज आदिस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये भेट घेतली. पॅलेसमध्ये आगमनावेळी पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला.
दोन्ही नेत्यांनी एकांतात, मर्यादित स्वरूपात आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या संर्व पैलूंवर विचारमंथन केले. हे परस्पर संबंध शतकानुशतके जडलेल्या सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहेत आणि जनतेच्या मजबूत संबंधांमुळे अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही नेत्यांनी या संबंधांचे महत्त्व लक्षात घेता भारत-इथिओपिया संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यास सहमती दर्शवली. ग्लोबल साउथचे भागीदार म्हणून, दोन्ही देशांनी सर्वसमावेशक जग निर्माण करण्यासाठी योगदान देत राहिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले की, 2023 मध्ये जी20 समूहाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आफ्रिकन युनियनचे जी20 सदस्य म्हणून स्वागत करणे हा भारतासाठी एक मोठा सन्मान होता, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत एकजुटीने उभे राहिल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी इथिओपियाचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि इथिओपिया यांच्यातील बहुआयामी भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला, ज्यात व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्षमता विकास, तसेच संरक्षण सहकार्य या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी आरोग्य सुरक्षा, डिजिटल आरोग्य, पारंपरिक औषधपद्धती, जन औषधी केंद्र, अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, नैसर्गिक शेती आणि कृषी-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये इथिओपियासोबत सहकार्य वाढवण्याची भारताची तयारी असल्याचे मोदी यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील घनिष्ठ विकास भागीदारीमुळे जनतेतील संबंध अधिक दृढ होत असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.
दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारीचा सविस्तर आढावा घेतला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, खाणकाम, महत्त्वपूर्ण खनिजे आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्यावर चर्चा केली. विश्वसनीय भागीदार म्हणून भारतीय कंपन्यांनी इथिओपियाच्या अर्थव्यवस्थेत, विशेषतः उत्पादन आणि औषधनिर्माण यांसारख्या आवश्यक क्षेत्रांमध्ये 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे 75,000 पेक्षा जास्त स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दोन्ही पंतप्रधानांनी ग्लोबल साउथच्या चिंतांना वाचा फोडण्यासाठी एकत्र काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी संयुक्त राष्ट्रांसह बहुपक्षीय स्तरावरील सहकार्यावर चर्चा केली. त्यांनी हवामान बदल, नवीकरणीय ऊर्जा आणि आपत्ती जोखीम कमी करणे यांसारख्या मुद्द्यांवर अधिक सहकार्याचे आवाहन केले आणि या संदर्भात, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA), कोॲलिशन फॉर डिझास्टर रेझिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चर (CDRI), ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स (GBA) आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या भूमिकेचे स्वागत केले. भारत आपल्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स भागीदार म्हणून इथिओपियासोबत तसेच प्रस्तावित भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदेसाठी सहकार्य करण्याची भारताची इच्छा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत खालील क्षेत्रांमध्ये तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या: संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमांसाठी प्रशिक्षण; सीमाशुल्क विषय परस्पर प्रशासकीय सहाय्य; आणि इथिओपियाच्या परराष्ट्र मंत्रालयात डेटा सेंटरची स्थापना.
पंतप्रधान डॉ. अबी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान डॉ. अबी यांना भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण दिले, जे डॉ. अबी यांनी स्वीकारले.
***
JaydeviPujariSwami/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205022)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam