सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
पीएम विश्वकर्मा कारागिरांसाठी बाजारपेठेतील प्रवेश मजबूत करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने केला अमेझॉनसोबत सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 3:15PM by PIB Mumbai
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत कारागिरांना ऑनलाइन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळावा, उत्पादने जास्तीत जास्त लोकांनी पहावीत आणि संपूर्ण भारतात त्यांचा ग्राहक वाढवावा यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने अमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय विकास आयुक्त आणि अमेझॉन पथकाने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेली पीएम विश्वकर्मा योजना नोंदणीकृत कारागिरांना समग्र समर्थन प्रदान करते. ही योजना कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणांद्वारे उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यावर, कर्जप्राप्ती सुलभ करणे आणि गुरु-शिष्य परंपरेअंतर्गत पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपारिक कौशल्यांना बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करते.
या सामंजस्य कराराद्वारे, अमेझॉन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाबरोबर सहकार्य करुन
पारंपारिक उत्पादन-आधारित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या कारागिरांना पाठबळ देईल. यात सुतारकाम, कुंभारकाम, धातूकाम, सोनारकाम, शिल्पकला, शिवणकाम, कुलूप निर्मिती, टोपली/चटई/काथ्या बनवणे, बाहुल्या आणि खेळणी बनवणे, माळा बनवणे, मोचीकाम इत्यादी यांचा समावेश आहे.

या भागीदारी अंतर्गत:
अमेझॉन पात्र विश्वकर्मा कारागिरांना त्यांच्या ऑनलाइन बाजारपेठेत समाविष्ट करण्यास मदत करेल
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय विद्यमान नियमांनुसार संबंधित विभागांकडून आवश्यक मान्यता, नोंदणी आणि मंजुरी मिळविण्यात मदत करेल.
अमेझॉनच्या कारीगर या उपक्रमाद्वारे हातमाग आणि हस्तनिर्मित उत्पादने जास्तीत जास्त पाहिली जातील, ज्यातून भारताची समृद्ध हस्तकला वारसा प्रदर्शित होण्याबरोबरच कारागिरांच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन मिळते.
ही सहयोगात्मक भागीदारी डिजिटल ई-कॉमर्स मंचांवर पारंपरिक कारागिरांची उपस्थिती बळकट करण्यासाठी, त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत प्रोत्साहन देण्यासाठी, आणि विकसित भारत तसेच आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळ देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
10 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या अमेझॉन संभव परिषद 2025 दरम्यान पंतप्रधान विश्वकर्मा लाभार्थ्यांनीही बूथमध्ये भाग घेतला. या परिषदेने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत रुची असलेल्या विक्रेत्यांना या उपक्रमाबद्दल जाणून घेण्याची आणि विश्वकर्मा कारागिरांशी जोडण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचे मार्ग शोधण्याची संधी दिली.
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203138)
आगंतुक पटल : 14