रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने ऊर्जाकर्षणाद्वारे अक्षय ऊर्जेला गती दिली असून, 812 मेगावॅट सौर आणि 93 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पांचे केले कार्यान्वयन;24 तास उपलब्ध राहणाऱ्या 1600 मेगावॅटच्या संकरित ऊर्जेसाठी केला करार
भारतीय रेल्वेचे 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य; सौर, पवन तसेच नवीकरणीय स्रोतांद्वारे ऊर्जेची गरज टप्प्याटप्प्याने करणार पूर्ण
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2025 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
सुरक्षितता, वक्तशीरपणा, विश्वसनीयता आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढवण्यासाठी,भारतीय रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असून आपल्या पायाभूत सुविधा आणि रेल्वे गाड्यांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. या सुधारणांद्वारे, कार्यप्रणालीच्या आधुनिकीकरणाबरोबरच प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वेने अद्ययावत होण्यासाठी केलेले प्रयत्न दिसून येतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि रेल्वे जाळ्याच्या विद्युतीकरणामुळे, कोळशावर आधारित इंजिन आणि डिझेल इंजिनच्या वापरात घट झाली आहे.
कोळशावर चालणारी वाफेची इंजिने केवळ युनेस्कोने मान्यता दिलेले पर्वतीय रेल मार्गावर धावतात. वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या हंगामी गाड्यांसाठी आणि आयसीआरटीसीच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये ही वाफेची वापरली जात आहेत. त्यांचा वापर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रेल्वे मार्गांवर केला जातो.
भारतीय रेल्वेने, कर्षण (ट्रॅक्शन) हेतूसाठी लागणारी आपल्या ऊर्जा विजेची खरेदी, धोरणात्मक नियोजनावर आधारित सौर, पवन आणि इतर नवीकरणीय स्रोतांच्या संयोजनाद्वारे, टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची योजना आखली आहे. याचा आणखी एक चांगला परिणाम म्हणजे, कार्बन उत्सर्जन कमी होईल.
भारतीय रेल्वेच्या कर्षण (ट्रॅक्शन) गरजा पूर्ण करणारे,सुमारे 812 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आणि सुमारे 93 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प नोव्हेंबर 2025 पर्यंत,कार्यान्वित करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय) कडून निरंतर गरज ('राउंड द क्लॉक' ,आरटीसी ) या पध्दतीने अंतर्गत करार केलेली 100 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा देखील कर्षण उद्देशासाठी उपलब्ध होऊ लागली आहे.याव्यतिरिक्त, ऊर्जाकर्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी आरटीसी मोड अंतर्गत 1500 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जा नूतनीकरणाचा करार करण्यात आला आहे. हा सौर, पवन आणि ऊर्जा साठवण या घटकांचा समावेश असलेला एक संयुक्त उपाय आहे.
2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वेने वीज खरेदी नियोजनाच्या आधारे सौर, पवन आणि इतर नवीकरणीय स्रोतांच्या संयोजनाद्वारे आपली विजेची गरज टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल.
यासंबंधी माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202563)
आगंतुक पटल : 10