जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सुजलाम भारत ॲपचे केले उद्घाटन


गावांना ग्रामीण पेयजल पुरवठा साधनांची वास्तविक माहिती मिळेल

प्रविष्टि तिथि: 10 DEC 2025 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025

केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील यांनी आज सुजलाम भारत अ‍ॅपचे उद्घाटन केले, जो नागरिक आणि प्रशासन या दोघांनाही व्यापक, वास्तविक माहिती देऊन ग्रामीण पेयजल प्रशासनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आरेखन केलेला एक महत्त्वाचा डिजिटल उपक्रम आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचे प्रगत भू-संदर्भ, देखरेख आणि व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉरमॅटिक्स (BISAG-N) च्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हटले की, "जल जीवन मिशनसाठी ही एक अतिशय महत्त्वाची सुरुवात आहे, ग्रामीण पेयजल पुरवठा प्रणालींमध्ये अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि सामुदायिक मालकी मजबूत करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.”

डीडीडब्ल्यूएसचे सचिव अशोक के.के. मीणा यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींना संबोधित केले आणि सुजलाम भारत मंचाच्या आकडेवारीचे वेळेवर एकत्रीकरण आणि संरचित अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

बीआयएसएजी-एनचे महासंचालक टी.पी. सिंह यांनी सुजलाम भारत ॲप आणि सुजलाम भारत डेटाबेसच्या तांत्रिक रचनेचे विश्लेषण केले. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे डिजिटल परिचालन आणि देखभालीसाठी संरचित दृष्टिकोन स्वीकारण्यात ही एकीकृत प्रणाली राज्ये आणि जिल्ह्यांना कशी मदत करेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा ऑनलाइन सहभाग दिसून आला, ज्यामुळे जल प्रशासन मजबूत करण्याच्या देशव्यापी वचनबद्धतेला बळकटी मिळाली.

 

सुजलाम भारत डेटाबेस कार्यान्वित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. प्रत्येक योजना आणि तिच्या सेवा क्षेत्रासाठी विशिष्ट सुजलाम भारत - सुजल गाव ओळख क्रमांक नियुक्त केला जाईल, ज्यामुळे कोणती योजना कोणत्या घरांना पाणीपुरवठा करत आहे याचे स्पष्ट आकलन होईल.

उद्घाटनानंतर BISAG-N तांत्रिक चमूने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सविस्तर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये सुजलाम भारत ॲपचा परिचालन वापर, भू-संदर्भ प्रक्रिया आणि सुजलाम भारत मंचावर ग्रामीण पाणीपुरवठा मालमत्तेचे एकत्रीकरण यावर भर देण्यात आला. 

या सत्रात राज्य अधिकाऱ्यांना नवीन प्रणालीचा अखंडपणे अवलंब करण्यासाठी आणि भूस्तरीय अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल, याची खात्री करण्यात आली.

हे व्यासपीठ ग्रामपंचायती/ग्राम आणि जलसंपदा सेवा प्रदात्यांच्या कामगिरीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करेल, ज्यामुळे समुदायाचा सहभाग आणि निरीक्षणाला चालना मिळेल.

जल जीवन मिशनचा डिजिटल कणा बळकट करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे, राष्ट्रीय जलजीवन अभियानाचे विशेष आणि व्यवस्थापकीय संचालक कमल किशोर सोन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात अधोरेखित केले. त्यांनी सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानले आणि त्यांना स्पष्ट कृती आराखडा तयार करण्याचे आणि वेळेवर डेटा सादर करण्याचे आवाहन केले, जेणेकरून अंमलबजावणी कोणत्याही अडचणी अथवा अडथळ्यांशिवाय सुरळीतपणे पुढे जाईल.

दीर्घकालीन शाश्वतता आणि नियोजनाचे बळकटीकरण

सुजलाम भारत डिजिटल नोंदणी पायाभूत सुविधांची स्थिती, देखभाल उपक्रम आणि सेवा-स्तरीय कामगिरीची पार्श्वभूमी, याबाबतची माहिती सुरक्षित ठेवेल, आणि अधिक विश्वासार्ह कार्यान्वयन आणि दीर्घकालीन शाश्वततेला समर्थन देईल. या प्लॅटफॉर्मचे पीएम गती शक्ती जीआयएस बरोबरचे एकत्रीकरण ग्रामीण जल नेटवर्कचे अद्ययावत भू-स्थानिक मॅपिंग प्रदान करते, जे भविष्यातील नियोजन, दुरुस्ती आणि विस्ताराला अधिक अचूकतेने समर्थन देते.

म्हणूनच सुजलाम भारत ॲपचा प्रारंभ म्हणजे सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञान-सक्षम ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या परिसंस्थेच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे प्रत्येक कुटुंबाला शाश्वतपणे सुरक्षित पाणी पुरवठा सेवा मिळत राहतील, याची खात्री होते.

थोडक्यात: ज्याप्रमाणे ‘आधार’, हे भारताच्या ओळख प्रणालीचा कणा बनले, त्याचप्रमाणे सुजलाम भारत - सुजल गाव आयडी ग्रामीण जल व्यवस्थापनाची ओळख म्हणून काम करेल, जो पारदर्शक, जबाबदार आणि नागरिक-केंद्रित सेवा वितरण चौकटीचा पाया तयार करेल.

सुजलाम भारत ॲप लवकरच गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोडसाठी उपलब्ध होईल.

 

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2201975) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati