महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे गव्हावर आधारित पोषण कार्यक्रम आणि किशोरवयीन मुलींसाठीच्या योजनेंतर्गत अनुदानित दरांमध्ये गहू,पोषक तांदूळ आणि भरड धान्यांचे वितरण
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय गव्हावर आधारित पोषण कार्यक्रम (डब्ल्यूबीएनपी)आणि किशोरवयीन मुलींसाठीच्या योजनेंतर्गत (एसएजी) अन्न आणि सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून अनुदानित दरांमध्ये गहू, पोषक तांदूळ आणि भरड धान्ये अशा अन्नधान्यांचे वितरण करत आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये उष्ण, शिजवलेले जेवण (एचसीएम) तयार करण्यासाठी तसेच टेक होम रेशन (टीएचआर) म्हणजेच घरच्यासाठी शिधा पुरवठा करण्यासाठी या धान्यांचे वितरण करण्यात येत आहे. विद्यमान आर्थिक वर्षात डब्ल्यूबीएनपीच्या माध्यमातून अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, चंदीगड, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, आणि उत्तराखंड या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तर एसएजी अंतर्गत आसाम, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, मेघालय आणि तेलंगणा या राज्यांना अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील लाभार्थी, गरोदर महिला आणि स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांमध्ये निवड करणाऱ्या किशोरवयीन मुली यांना टीएचआरच्या स्वरुपात भरड धान्यांवर आधारित पाककृतींचा पुरवठा करत आहे. मात्र टीएचआर आणि एचसीएमसाठी स्थानिक पाककृतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट घटकांची निवड पूर्णतः संबंधित राज्य सरकारे/स्थानिक अधिकारी यांच्या अखत्यारीत असून ती स्थानिकांची आवड निवड आणि स्थानिक पातळीवर पिकवली जाणारी/उपलब्ध होणारी फळे तसेच भाज्या यांच्यावर अवलंबून असते.
राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी आज ही माहिती दिली.
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201727)
आगंतुक पटल : 17