अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयची “ऑपरेशन हिन्टरलँड ब्र्यू” अंतर्गत मोठी कारवाई; महाराष्ट्रात वर्धा इथे बेकायदेशीर अंमली पदार्थ कारखाना उद्ध्वस्त:192 कोटी रुपयाचे 128 किलो मेफेड्रोन जप्त;तीन जणांना अटक

प्रविष्टि तिथि: 09 DEC 2025 9:33PM by PIB Mumbai

मुंबई,9 डिसेंबर 2025

महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी “ऑपरेशन हिन्टरलँड ब्र्यू” या विशेष कारवाईदरम्यान महाराष्ट्रातील वर्धा येथे चालवण्यात येत असलेली एक गुप्त मेफेड्रोन उत्पादन  यंत्रणा यशस्वीरित्या उद्ध्वस्त केली. या कारवाईत अंदाजे 192 कोटी रुपये किमतीचे 128 किलो मेफेड्रोन, तसेच 245 किलो प्रीकर्सर रसायने, कच्चा माल व संपूर्ण प्रक्रिया  यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी नजर  ठेवून वर्धा पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील करंजा (घाडगे) परिसरातील झुडपांनी आच्छादित दुर्गम क्षेत्रात शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना तात्पुरत्या पद्धतीने उभारलेली, पूर्ण क्षमतेने चालणारी कृत्रिम अंमली पदार्थ उत्पादन यंत्रणा आढळली. यात तात्पुरते रिअॅक्टर्स, भांडी आणि मेफेड्रोनच्या बेकायदा निर्मितीसाठी वापरली जाणारी इतर उपकरणे होती. जप्त मालामध्ये तयार मेफेड्रोन तसेच त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली प्रीकर्सर रसायने यांचा समावेश होता.

ही बेकायदेशीर यंत्रणा स्थानिक व्यक्तींनी जाणूनबुजून ग्रामिण परिसरात मिसळून जावी आणि कोणताही संशय येऊ नये यासाठी उभारली होती. उत्पादन युनिट हे पूर्णपणे तात्पुरते, मॉड्युल स्वरूपातील, कोणतेही लक्ष वेधून न घेणारे आणि दाट झुडपांच्या आत खोलवर लपलेले होते.

या यंत्रणेचे संचालन करणारे तीन जण, ज्यामध्ये मुख्य सूत्रधार जो आर्थिक पुरवठादार आणि रसायनाची माहिती असलेला  म्हणूनही कार्यरत होता, तसेच त्याचे दोन सहकारी यांना अटक करण्यात आली. हे सर्वजण मेफेड्रोनच्या उत्पादन व वितरण साखळीत सक्रियरीत्या सहभागी असल्याचे दिसून आले. तिघांनाही एनडीपीएस अधिनियम 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

या कारवाईसह, डीआरआयने या वर्षी आतापर्यंत पाच गुप्त अंमली पदार्थ उत्पादन यंत्रणा उद्ध्वस्त केल्या आहेत. या सातत्यपूर्ण, गुप्तवार्ता-आधारित कारवाई  डीआरआयचे सततचे दक्ष प्रयत्न, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि नशा मुक्त भारत अभियानाप्रती सरकारची  दृढ बांधिलकी अधोरेखित करतात, ज्यामुळे नागरिकांना अंमली आणि मानसिक प्रभाव करणाऱ्या पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण मिळते.

 

 

निलीमा ‍चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2201171) आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Telugu