संरक्षण मंत्रालय
पूर्वावलोकन : भारतीय नौदल अकादमी प्रतिष्ठित ‘अॅडमिरल्स कप - 2025’ स्पर्धा आयोजित करणार
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2025 3:58PM by PIB Mumbai
नौदल अधिकारी प्रशिक्षणातील देशातील सर्वोच्च संस्था असलेली येथील भारतीय नौदल अकादमी (आयएनए) एझिमाला 08 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान अॅडमिरल्स कप 2025 स्पर्धेचे आयोजन करत आहे. जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित नौदल नौकानयन स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या 14व्या आवृत्तीत 35 देश सहभागी होणार आहेत. यामुळे जागतिक सहभागात मोठी वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय सागरी समुदायात या स्पर्धेचे वाढते महत्त्व अधोरेखित होते.
स्पर्धा आयएलसीए–6 श्रेणीतील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सेलबोट्सचा वापर करून मॅच रेसिंग स्वरूपात आयोजित केली जाते. ही नौका स्पर्धकांच्या रणनिती, शारीरिक क्षमता आणि अचूक नौकानयन कौशल्याची कसोटी घेण्यासाठी ओळखली जाते.
या वर्षी आशिया, युरोप, आफ्रिका, ओशियानिया आणि अमेरिका या खंडांतील संघ सहभागी होत असल्याने विविध सागरी परंपरा आणि संस्कृती एका मंचावर एकत्र येणार आहेत. ही स्पर्धा केवळ निखळ स्पर्धात्मकता वाढवते असे नाही, तर जगातील नौदल दलांच्या भावी नेतृत्वामधील व्यावसायिक बंध अधिक दृढ करण्यास मदत करते.
आयएनए मधील अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक बाह्य नौकानयन संकुल आणि एझिमाला किनाऱ्याचे अनुकूल वातावरण यामुळे या स्तराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य ठरते. स्पर्धेबरोबरच सहभागी संघांना अकादमीच्या परंपरा, पायाभूत सुविधा आणि भारतीय नौदलाच्या मूल्यमंत्रांचा अनुभव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, परस्परसंवाद आणि व्याप्ती वाढवणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
09 डिसेंबर 2025 रोजी उद्घाटन सोहळा होईल, त्यानंतर चार दिवस समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत रोमांचक नौकानयन शर्यती होतील. 13 डिसेंबर 2025 रोजी समारोप सोहळा आयोजित केला जाईल, ज्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना आणि वैयक्तिक खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले जातील.
IDD1.png)
J5RF.jpg)
NVM2.jpg)
***
सुषमा काणे/गजेंद्र देव़डा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2200070)
आगंतुक पटल : 20