ऊर्जा मंत्रालय
भारताच्या वीज क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग आधारित ( ऍप्लिकेशन्स) अनुप्रयोग महत्वाची भूमिका बजावतील- केंद्रीय मंत्री मनोहर लाल
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2025 2:04PM by PIB Mumbai
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग आधारित अनुप्रयोग कुशल, ग्राहक-केंद्रित आणि स्वयं-सुधारणा वितरण प्रणाली विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील, असे वीज मंत्री मनोहर लाल यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम, येथे आज झालेल्या वीज वितरण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमधील सहभागीना संबोधित करताना ते बोलत होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग आधारित उपाययोजना, स्मार्ट मीटर विश्लेषण, डिजिटल ट्विन्स, आगाऊ देखभाल व्यवस्थापन, वीज चोरी शोधण्याची प्रणाली, उपकरण-स्तरीय ग्राहक आकलन, स्वयंचलित बिघाड-भविष्यवाणी आणि जेनरेटिव्ह एआय-आधारित निर्णय सहाय्य या सर्व तंत्रज्ञानांमुळे ग्राहकांच्या अनुभवात तसेच कार्यकारी कार्यक्षमतेत आमूलाग्र परिवर्तन घडू शकते, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय परिषदेमध्ये उद्योगक्षेत्र, विविध राज्ये, नवोन्मेषक, शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान भागीदार यांच्या सक्रीय सहभागाचे मनोहर लाल यांनी कौतुक केले. वितरण कंपन्या, प्रगत मीटरिंग पायाभूत सुविधा सेवा प्रदाते , तंत्रज्ञान उपाय प्रदाते आणि गृह स्वयंचलन उपाय प्रदाते यांनी सादर केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग उपायांचीही त्यांनी प्रशंसा केली.

स्मार्ट, विश्वासार्ह आणि ग्राहक-केंद्रित वितरण प्रणालींकडे संक्रमण करण्यासाठी पर्यावरणातील सर्व संबंधित हितधारकांशी घनिष्ठ समन्वय साधण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. सर्व वीज वितरण कंपन्यानी, ग्राहकांशी सक्रिय संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचेही मनोहर लाल यांनी नमूद केले. नवीन तंत्रज्ञानाभोवती कधी कधी निर्माण होणारे गैरसमज दूर करणे आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञान स्वीकृतीसाठी ग्राहकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्युत प्राधिकरणाद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्टेलर’ या मंचाचे विद्युतमंत्री मनोहर लाल यांनी लोकार्पण केले. हा मंच वीज वितरण कंपन्यांना दीर्घकालीन भार-पर्याप्तता अभ्यास करण्यासाठी तसेच दीर्घकालीन पर्याप्तता आराखडे तयार करण्यासाठी बळकट करेल. या व्यतिरिक्त, इंडिया स्मार्ट ग्रीड फोरमने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स उपाययोजना तसेच वीज वापरासाठी मार्गदर्शक आराखडा या पुस्तिकेचे सादरीकरण केले. या पुस्तिकेत एकूण 174 केसेस दिल्या असून त्यापैकी 45 भारतीय युटिलिटीजच्या आहेत.
***
सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2200052)
आगंतुक पटल : 19