संरक्षण मंत्रालय
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संयुक्त सैन्य सराव 'गरुड शक्ती'ला हिमाचल प्रदेशमध्ये प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 4:26PM by PIB Mumbai
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील 'गरुड शक्ती' या संयुक्त सैन्य सरावाच्या दहाव्या आवृत्तीला हिमाचल प्रदेशमधील बाकलोह येथील विशेष दल प्रशिक्षण केंद्रात प्रारंभ झाला. हा सराव 03 ते 12 डिसेंबर दरम्यान चालणार आहे.
द पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल) चे अधिकारी भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्त्व करत असून इंडोनेशियाच्या लष्कराचे प्रतिनिधित्व इंडोनेशियन विशेष दलाचे जवान करत आहेत.
या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही सैन्याच्या विशेष दलांमधील परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा आहे. या सरावा अंतर्गत दहशतवादविरोधी वातावरणात सैन्य तुकडी स्तरावरील रणनीती, तंत्रे आणि कार्यपद्धतींचा समावेश आहे. यात निःशस्त्र संग्राम तंत्र, युद्धगोळीबार, स्नायपिंग, हेलीबोर्न ऑपरेशन्स, तसेच निम-पर्वतीय प्रदेशात ड्रोन, प्रतिरोधक-UAS आणि लोइटर-म्युनिशन हल्ल्यांच्या नियोजनाचा समावेश आहे. प्रशिक्षणात शस्त्रे, उपकरणे आणि कार्यात्मक पद्धतींबाबत तज्ञ मार्गदर्शन आणि माहितीची देवाणघेवाणही केली जाईल.
हे संयुक्त प्रशिक्षण शारीरिक तंदुरुस्ती, रणनीतिक कवायती, उच्च तीव्रतेची युद्ध कौशल्ये यावर भर देण्यासाठी तयार केले आहे. वास्तविक परिस्थितीत दोन्ही लष्करांमधील सहनशीलता, समन्वय आणि युद्धसज्जता यांचा कसा वापर केला जातो या प्रकारचे प्रात्यक्षिक असलेल्या सरावाने या संयुक्त प्रशिक्षणाची सांगता होईल.
दोन्ही मित्र राष्ट्रांमधले द्विपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा सराव म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
R6V5.jpg)

***
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199123)
आगंतुक पटल : 4