भारतीय निवडणूक आयोग
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे स्टॉकहोम येथील स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स (यूआय) येथे व्याख्यान
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 5:11PM by PIB Mumbai
इंटरनॅशनल आयडिया सदस्य राष्ट्रांच्या परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ झाला सुरू
- भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज स्वीडनमधील स्टॉकहोम येथील स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स (यूआय) येथे 'भारताच्या लोकशाहीमध्ये डोकावताना' या विषयावर गोलमेज परिसंवाद आयोजित केला होता.
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल वर्ष 2026 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्सच्या (इंटरनॅशनल आयडिया) सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. आज त्यांच्या स्वीडनच्या अधिकृत दौऱ्याचा समारोप होईल.
- भारताचे अध्यक्षपद हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो जगातील सर्वात विश्वासार्ह आणि नाविन्यपूर्ण निवडणूक व्यवस्थापन संस्था (ईएमबी) पैकी एक म्हणून भारतीय निवडणूक आयोगाची जागतिक मान्यता दर्शवितो. इंटरनॅशनल आयडियाचा संस्थापक सदस्य असलेल्या भारताने संस्थेच्या प्रशासनात, लोकशाही प्रवचनामध्ये आणि संस्थात्मक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे.
- स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झालेल्या आपल्या स्वीकृती भाषणात आयुक्त कुमार यांनी भारताच्या लोकशाही प्रक्रियेच्या व्याप्तीवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 90 कोटींहून अधिक मतदार आहेत.
- 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात त्यांनी माहिती दिली की भारताने एक चित्तथरारक लोकशाही उत्सव पाहिला जिथे 6 राष्ट्रीय आणि 67 राज्य पक्षांसह 743 राजकीय पक्षांच्या 20,000 हून अधिक उमेदवारांनी भाग घेतला. 10 लाखांहून अधिक बूथस्तरीय अधिकारी आणि 50 लाख मतदान कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले होते.
- 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने संसदेच्या 18 सार्वत्रिक निवडणुका आणि राज्य विधिमंडळांच्या 400 हून अधिक सार्वत्रिक निवडणुका पाहिल्या आहेत हे लक्षात घेऊन, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, भारत हा फक्त जगातील सर्वात मोठ्या, सर्वात वैविध्यपूर्ण आणि समावेशक आधुनिक लोकशाहीची शिकवणच नव्हे तर भारताच्या संस्कृतीच्या वारशात खोलवर रुजलेली लोकशाही मूल्ये आणि तत्त्वे देखील सर्वांसोबत सामायिक करतो.
- पुढील दिशा निश्चित करताना, त्यांनी भारताचे अध्यक्षपद निर्णायक, महत्त्वाकांक्षी आणि कृतीशील असेल अशी ग्वाही दिली.
- भारत प्रत्येक मताला महत्त्व देईल, प्रत्येक आवाजाला महत्त्व देईल आणि जगभरातील लोकशाही अधिक समावेशक, शांततापूर्ण, लवचिक आणि शाश्वत बनेल याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन देऊन आयुक्तांनी आपल्या स्वीकृती भाषणाचा समारोप केला.
- 2026 या वर्षासाठी भारताकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असून मॉरिशस आणि मेक्सिको आंतरराष्ट्रीय आयडिया परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.
***
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199112)
आगंतुक पटल : 5