पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटन स्थळांना प्रोत्साहन

प्रविष्टि तिथि: 04 DEC 2025 3:43PM by PIB Mumbai

पर्यटन मंत्रालय महत्त्वाच्या आणि संभाव्य ठिकाणी (परदेशात आणि भारतात) विविध पर्यटन स्थळांची माहिती आणि अनुभव यांना प्रोत्साहन देत असते.

पर्यटकांसाठी विविध उपक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करत आणि त्यांचा सहभाग नोंदवित; तसेच मेळे आणि उत्सव आयोजित करण्यासाठी राज्य सरकारांना मदत करून; मंत्रालयाच्या आतिथ्यशीलता  कार्यक्रमांतर्गत देशाला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती, सहल  चालक,पत्रकार आणि माहिती सांगणाऱ्या व्यक्तिंना आमंत्रित करत; संकेतस्थळ  आणि सामाजिक  माध्यमांद्वारे विविध माहितीपर प्रचार उपक्रम यांच्या माध्यमातून; तसेच राज्य सरकारे आणि परदेशातील भारतीय संस्था यांच्या सहकार्याने जाहिराती देऊन याला प्रोत्साहन दिले जाते .

भारताला जागतिक स्तरावर एक आघाडीचे MICE (सभा, संमेलने,परीषदा प्रदर्शने यांचे आयोजन करणारे ठिकाण)स्थळ  म्हणून स्थान देण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाने MICE उद्योगासाठी राष्ट्रीय रणनीती आणि एक आराखडा विकसित केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 2021 मध्ये, "मीट इन इंडिया"‌या नावाने एका सहायक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश भारताला व्यापक स्तरावरील परिषद  आणि प्रदर्शनांचे केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे, जागरूकता निर्माण करणे आणि देशाच्या MICE क्षमतेबद्दल सकारात्मक जागतिक धारणा निर्माण करणे हा होता.

जागतिक स्तरावर भारताला प्रमुख वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने 2023 मध्ये "इंडिया सेज आय डू" ही मोहीम देखील सुरू केली आहे.

पर्यटन मंत्रालयाने देशातील समृद्ध सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि विविध आकर्षणे पहाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांसाठी आणि भागधारकांसाठी एक व्यापक संसाधन म्हणून अतुल्य भारत डिजिटल प्लॅटफॉर्म (IIDP) ची सुधारित आवृत्ती सादर‌ केली आहे.

हे व्यासपीठ पर्यटकांना देशातील सांस्कृतिक, वारसा, साहस, खाद्यसंस्कृतीचा आस्वाद, प्रकृतीशारिरीक स्वास्थ्यासाठी विशेष कार्यक्रम, कला आणि हस्तकला, ग्रामीण इत्यादी पर्यटन स्थळांचा आभासी पध्दतीने देखील अनुभव देते. आयआयडीपी हे एक कृत्रिम प्रज्ञा-संचालित साधन असून याद्वारे प्रत्यक्ष हवामानाचा अंदाज,शहर अन्वेषण आणि आवश्यक प्रवासी सेवा यांची माहिती देऊन पर्यटकांना वैयक्तिकृत अनुभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

पर्यटन मंत्रालयाने डिजिटल तसेच सामाजिक माध्यम, विशेष सादरीकरण,पत्रके, स्थळ चित्रीकरण, लघु संदेश सेवा (एसएमएस) आणि व्हॉट्सअॅप मोहीम तसेच मायगव्ह प्लॅटफॉर्मसह यासह विविध मंचाचा उपयोग करत विविधप्रकारे  नागरिकांशी संवाद साधण्यासाठी 'देखो अपना देश पीपल्स चॉइस पोल' (देखो अपना देश- लोकांची निवड) ही मोहीम हाती घेतली होती.याव्यतिरिक्त, वेबिनार, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रतिज्ञा, चर्चासत्रे इत्यादींद्वारे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मंत्रालय नियमितपणे मायगव्ह प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सहकार्य करते.

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

सुषमा काणे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(रिलीज़ आईडी: 2199010) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी