युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘ऑल इंडिया माउंट गिरनार अॅसेंडिंग डिसेंट’ स्पर्धा-2026 चे फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजन
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 1:58PM by PIB Mumbai
दरवर्षी गुजरात सरकारद्वारे गिरनार-जुनागड येथे अखिल भारतीय पर्वत गिरनार आरोहण उतरण स्पर्धा आयोजित करण्यात येते. गांधीनगर येथील आयुक्तालय, युवा सेवा आणि सांस्कृतिक उपक्रम, यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी विहित अर्ज खुले असून कार्यालयीन वेळेत ते उपलब्ध असतील.
विहित अर्ज कार्यालयीन वेळेत आणि https://commisynca.gujarat.gov.in/application-forms.html या संकेतस्थळावर आणि डायडो जुनागढ फेसबुक आयडीवर देखील उपलब्ध आहे. अर्जदाराने पूर्ण भरलेला अर्ज "जिल्हा युवा आणि सांस्कृतिक उपक्रम कार्यालय, जुनागड" 1/1 बहुमजली इमारत, सरदारबाग जिल्हा: जुनागड (गुजरात राज्य) येथे 02-01-2026. रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना गुजरात सरकारकडून पुढे नमूद केल्याप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येतील.
|
क्रमांक
|
रोख पुरस्कार
|
|
प्रथम
|
Rs. 1,00,000
|
|
द्वितीय
|
Rs. 85,000
|
|
तृतीय
|
Rs. 70,000
|
|
चतुर्थ
|
Rs. 55,000
|
|
पाचवा
|
Rs. 40,000
|
|
सहावा
|
Rs. 25,000
|
|
सातवा
|
Rs. 25,000
|
|
आठवा
|
Rs. 25,000
|
|
नववा
|
Rs. 25,000
|
|
दहावा
|
Rs. 25,000
|
***
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2198692)
आगंतुक पटल : 10