कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डिजिटल सक्षमीकरणातून निवृत्तिवेतनधारकांसाठी राहणीसुलभता : डिजिटल जीवन प्रमाणपत्रे मोहिम 4.0 चे यश- 1.54 कोटी डिजिटल जीवन प्रमाणपत्रे देण्यात आली
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
निवृत्तिवेतन व निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने डिजिटल जीवन प्रमाणपत्रे मोहिम 4.0 ची यशस्वी सांगता केली आहे. सोप्या पद्धतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा विशेषतः अति वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सर्व हितधारकांच्या व्यापक सहयोगाने व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने विभागाने एक मोठा टप्पा पार केला आहे.
महत्वाच्या उपलब्धी:
निवृत्तिवेतनधरकांच्या कल्याणासाठी राबवण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या DLC 4.0 मोहिमेत 1.54 कोटी डिजिटल जीवन प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
यामध्ये 91 लाखाहून जास्त DLC प्रमाणपत्रे चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा वापर करून देण्यात आली. ही संख्या DLC 3.0 मोहिमेच्या तुलनेत ही संख्या 230 पटींनी जास्त आहे. ज्यांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत अशा वयोवृद्ध निवृत्तिवेतनधारकांसाठी, घरातून बाहेर पडणे कठीण असलेल्या दिव्यांगजनासाठी, तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील निवृत्तिवेतनधारकांसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरली . आधार अवलंबित डिजिटल प्रमाणीकरणाचा निवृत्तिवेतनधारकांमधील वाढता स्वीकार या DLC 4.0 मोहिमेच्या यशातून दिसून येतो.
योजनाबद्ध प्रयत्नांमुळे वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या 11 लाखांहून अधिक निवृत्तिवेतनधारकांनी डीएलसी सादर केली होती. बँका व IPPB नी पुढाकार घेत अतिवरिष्ठ निवृत्तिवेतनधारकांच्या घरोघरी जाऊन सुविधा उपलब्ध करून दिल्या.
देशातील अतिदूर, दुर्गम, अशा जवळजवळ सर्वच भागात ही मोहीम राबवली गेली होती आणि यातून कोणीही वगळले जाऊ नये यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात आले होते. बँका, टपाल कार्यालये, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही मोहीम सर्वव्यापी करण्यात आली होती.
सर्व प्रकारच्या अडचणींवरील उत्तम उपाययोजना राष्ट्रीय DLC पोर्टलवर सामायिक केल्या गेल्या होत्या.
डीडी न्यूज, आकाशवाणी, संसद टी व्ही च्या माध्यमातून तसेच पीटीआय, पीआयबी या छापील तसेच समाजमाध्यमांच्या साहाय्याने या DLC 4.0 मोहिमेचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यामुळे देशभरातील सुमारे 20 कोटी नागरिकांपर्यंत या मोहिमेबद्दल जागृती निर्माण झाली होती.
सुषमा काणे/ उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197164)
आगंतुक पटल : 10