संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल यल्ला उमेश यांनी भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडची सूत्रे स्वीकारली
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 3:32PM by PIB Mumbai
मुंबई,1 डिसेंबर 2025
एअर मार्शल यल्ला उमेश यांनी आज 01 डिसेंबर 2025 रोजी 39 वे एअर कमांडिंग इन चीफ म्हणून भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडची सूत्रे स्वीकारली. एअरॉनॉटीकल अभियांत्रिकी (यांत्रिक) शाखेत रुजू झाल्यापासून भारतीय हवाई दलाने केलेल्या अनेक मोठ्या लढाया, वाहतूक आणि विशेष ताफ्यांमध्ये त्यांनी विविध अभियांत्रिकी तसेच नेतृत्वविषयक भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्या आहेत.

कॅट ए’ एअरॉनॉटीकल अभियंता असलेल्या यल्ला यांनी व्यवस्थापन विषयात डॉक्टरेट, औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी आणि यांत्रिक अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवलेली आहे. संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय सेवेदरम्यान एअर मार्शल उमेश यांनी हवाई दल अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्रमुख, एअर कोमोडोर अभियांत्रिकी (वाहतूक), गाईडेड वेपन बेस रिपेअर डेपोचे एअर ऑफिसर कमांडिंग तसेच डीआर काँगो येथील संयुक्त राष्ट्रांद्वारे संचालित एअरफिल्डचे मुख्य अभियांत्रिकी अधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी समर्थपणे निभावली आहे. देखभाल कमांडची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी त्यांनी हवाई दलाच्या मुख्यालयात महासंचालक (विमाने)पदी काम केले. त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

देश आणि भारतीय वायुसेनेच्या सेवेतील 39 वर्षांच्या प्रतिष्ठित आणि समर्पित सेवा बजावल्यानंतर एअर मार्शल विजय कुमार गर्ग 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या पदावर आता एअर मार्शल यल्ला उमेश यांची नेमणूक झाली आहे.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196919)
आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English