रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
बडोदा –मुंबई द्रुतगती मार्गावरील हरित क्षेत्र पॅकेज 6 आणि 7 ची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी
Posted On:
27 NOV 2025 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हरित क्षेत्र वडोदरा–मुंबई द्रुतगतीमार्गाच्या पॅकेज 6 आणि 7 ची पाहणी केली. हा द्रुतगतीमार्ग महत्त्वाकांक्षी दिल्ली–मुंबई द्रुतगतीमार्ग प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, त्यांनी या महत्त्वपूर्ण पॅकेजेसच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन, कामांची वेळेत पूर्तता तसेच सर्व बांधकाम स्थळांवर सक्षम आणि बळकट सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित पथकांना दिल्या.
हा द्रुतगती मार्ग प्रवासाचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचवेल, प्रमुख औद्योगिक केंद्रे आणि ‘पीएम गतिशक्ती’ नोड्सशी सुलभ संपर्क वाढवेल तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला गती देईल, असे गडकरी यांनी सांगितले.
सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195636)
Visitor Counter : 8