विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारताचे पहिलेवहिले सार्वभौम बहुभाषिक आणि बहुपद्धतीय कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे संचालित भव्य भाषिक मॉडेल म्हणून “भारतजेन” या उपक्रमाची प्रशंसा केली


केंद्रीय मंत्र्यांनी “भारतजेन”च्या गाभा पथकाशी साधला संवाद, या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कार्याचा घेतला आढावा तसेच आयआयटी मुंबई या संस्थेला दिलेल्या भेटीदरम्यान विस्तृत सादरीकरणाच्या वेळी देखील राहिले उपस्थित

Posted On: 25 NOV 2025 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज आयआयटी मुंबई या संस्थेला दिलेल्या भेटीदरम्यान भारताचे पहिले वहिले सार्वभौम बहुभाषिक आणि बहुपद्धतीय कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे संचालित भव्य भाषिक मॉडेल अशा शब्दात “भारतजेन” या उपक्रमाची प्रशंसा केली.

या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी “भारतजेन”च्या गाभा पथकाशी संवाद साधला.या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला तसेच यावेळी केलेल्या विस्तृत सादरीकरणाच्या वेळी देखील ते उपस्थित राहिले.

या उपक्रमाविषयी माहिती देताना, भारतजेनचे प्रभारी प्राध्यापक, प्रा.गणेश रामकृष्णन यांनी या मॉडेलच्या कार्याविषयी तपशीलवार माहिती दिली, हे कोणते कार्य साध्य करते, आणि भविष्यासाठी ते कशा पद्धतीने राष्ट्रीय एआय मालमत्ता म्हणून विकसित करण्यात येत आहे याची देखील त्यांनी माहिती दिली.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना असे सांगण्यात आले की, भारतजेन हा आपल्या देशातील भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचे खऱ्या अर्थाने दर्शन घडवणारे भव्य भाषिक मॉडेल निर्माण करण्यासाठी देशाचा पहिलाच सार्वभौम प्रयत्न आहे. बावीसपेक्षा जास्त भारतीय भाषांना पाठबळ देण्यासाठी निर्मित भारतजेन मध्ये मजकूर, भाषण आणि दस्तावेज संकल्पना अशा तीन प्रमुख पद्धतींना एकत्र करतो, जेणेकरून भारतीय नागरिक ज्या पद्धतीने नैसर्गिकपणे संवाद साधतात त्याच पद्धतीने हे मॉडेल माहिती समजून घेईल, निर्माण करेल आणि त्याचा अर्थ लावेल. यावेळी केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले की, हे अभियान समावेशक डिजिटल भविष्य उभारण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आले असून यामध्ये प्रत्येक भारतीय भाषा, बोली आणि प्रादेशिक संदर्भ यांना देशाच्या एआय क्षमतांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले असेल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे सातत्याने भर दिला जात असलेल्या उद्दिष्टात म्हणजेच भारताला आघाडीच्या तंत्रज्ञानामध्ये जागतिक नेता बनवण्याच्या विस्तृत राष्ट्रीय स्वप्नाला अनुसरून आहे. भारताच्या सामर्थ्यात रुजलेले, भारताच्या गरजा पूर्ण करणारे आणि भारतीय नजरेतून जगामध्ये योगदान देणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी वारंवार आवाहन केले आहे.

यावेळी झालेल्या सादरीकरणात असे अधोरेखित करण्यात आले की आयआयटी मुंबई या संस्थेतील तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 235कोटीं रुपयांच्या निधीसह, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय आंतरशाखीय सायबर -भौतिक प्रणाली अभियानांतर्गत (एनएम-आयसीपीएस) भारतजेन प्रकल्पाला पाठबळ देण्यात येत आहे.आयआयटी मुंबईच्या नेतृत्वाखालील संघात आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मंडी, आयआयएम इंदोर, आयआयटी खरगपूर, आयआयआयटी दिल्ली अशा आघाडीच्या संस्था समाविष्ट असतील.

आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या सर्व भारतजेन नमुन्यांचा त्यांनी आढावा घेतला.

या संवादादरम्यान पथकाने त्यांना भारतजेनमध्ये असलेल्या संकल्पनात्मक पुरावा साधनांचे प्रात्यक्षिक दाखवले.यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत प्रश्न विचारणारे आणि त्वरित पाठबळ मिळणे शक्य करणारे आवाजाद्वारे संचालित व्हॉट्स अॅप आधारित कृषी साठी या सल्लागार सेवा साधनाचा; लहान विक्रेत्यांना त्यांची डिजिटल उपस्थिती वाढवण्यासाठी मदत करणारे, एका प्रतिमेपासून स्वयंचलित पद्धतीने उत्पादनाचे वर्णन करणारे ई-व्हीआयकेआरएआय तसेच डॉकबोध पत्रम द्वारे संचालित, हा नागरिकांना क्लिष्ट मजकूर समजण्याजोग्या स्वरुपात उपलब्ध करून देणारा उपक्रम यांचा यात समावेश होता. अशी साधने कृत्रिम बुद्धीमत्ता कशा प्रकारे दैनंदिन जीवन सुधारु शकतात आणि पोहोचण्यास कठीण अशा दुर्गम भागांतील प्रत्येकापर्यंत सार्वजनिक सेवा पोहोचवता येतात हे स्पष्टपणे दाखवून देतात असे निरीक्षण केंद्रीय मंत्र्यांनी नोंदवले.

ते म्हणाले की भारतजेन भारताच्या डिजिटल दशकाला आकार देण्यात निर्णायक भूमिका निभावेल आणि जागतिक एआय परिदृश्यात अर्थपूर्ण योगदान देणे देशाला शक्य करेल.

 

निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2194379) Visitor Counter : 5