संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक कंपन्यांनी भारताच्या गतिमान जहाजबांधणी उद्योगातील क्षमतेचा उपयोग करून पुढील पिढीतील सागरी क्षमता सह-विकसित कराव्यात आणि सुरक्षित भविष्याची निर्मिती करावी : संरक्षण मंत्र्यांचे 'समुद्र उत्कर्ष'मध्ये प्रतिपादन


"भारतातील जहाज बांधणी यार्ड्स आपल्या उदयोन्मुख नील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत”

Posted On: 25 NOV 2025 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

भारताच्या गतिमान जहाजबांधणी उद्योगातील क्षमतेचा उपयोग करण्याचे आणि पुढील पिढीतील सागरी क्षमता सह-विकसित करण्याचे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय भागीदारांना आवाहन केले आहे. यामुळे शाश्वत तंत्रज्ञान आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण होईल, तसेच जगासाठी एक नाविन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि सुरक्षित भविष्य साकारले जाईल, असे त्यांनी सांगितले. आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण उत्पादन विभागाने आयोजित केलेल्या आणि भारतीय जहाज बांधणी यार्डची क्षमता दर्शवणाऱ्या 'समुद्र उत्कर्ष' या परिसंवादात ते बोलत होते.

"एका ध्येयाने काम करणारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि गतिमान खाजगी क्षेत्रातील भागीदारांनी बनलेला भारतीय जहाजबांधणी उद्योग, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करत आहे आणि भारत 'केवळ जहाजांची नव्हे, तर विश्वासाची'; 'केवळ प्लॅटफॉर्म्सची नव्हे तर, तर भागीदारीची' निर्मिती करून सागरी शतकाला आकार देण्यासाठी सज्ज आहे," असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले. "हजारो एमएसएमईंच्या पाठबळाने आपल्या सार्वजनिक आणि खाजगी जहाजबांधणी यार्डनी एक मजबूत मूल्य साखळी तयार केली आहे, ज्यात पोलाद, प्रणोदन, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स आणि प्रगत लढाऊ प्रणाली यांचा समावेश आहे," असे त्यांनी उपस्थित उद्योग भागधारक, परदेशी भागीदार, प्रतिनिधी आणि सशस्त्र दलांमधील तसेच मंत्रालयांमधील अधिकाऱ्यांना सांगितले. भारताची जहाजबांधणी परिसंस्था अनेक जागतिक दर्जाच्या मंचांच्या सामर्थ्यावर उभी आहे, जी तंत्रज्ञानाची प्रगल्भता आणि औद्योगिक सखोलतेचे दर्शन घडवत आहे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला.

उच्च श्रेणीतील प्रवासी आणि मालवाहू जहाजे, किनारी फेऱ्यांसाठीच्या नौका, प्रदूषण नियंत्रण आणि संशोधन जहाजे, तसेच इस्रो आणि राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेसाठी जगातील सर्वात प्रगत खोल समुद्रातील खाणकामासाठी उपयुक्त जहाज यांचा उल्लेख करत, भारतीय जहाजबांधणी यार्ड जागतिक व्यावसायिक आणि दुहेरी-वापर असलेल्या सागरी उद्योगात प्रमुख उद्योग म्हणून उदयाला येत आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली.

राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही विमानवाहू नौका ते प्रगत संशोधन जहाजे आणि ऊर्जा-कार्यक्षम व्यापारी जहाजे यांची बांधणी करण्यामध्ये सक्षम आहोत. ही एकात्मिक क्षमता भारताला आगामी दशकात जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि सागरी नवोन्मेषांचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी अतिशय पोषक आहे.

सध्या भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे निर्माणाधीन असलेले प्रत्येक जहाज भारतीय जहाजबांधणी यार्ड्समध्येच बनवले जात असून , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातील 'आत्मनिर्भर भारता' ची प्रचीती आहे यावर संर क्षणमंत्र्यांनी भर दिला.

सरकारच्या प्रयत्नांमुळेच भारतीय नौदलाचे 262 स्वदेशी डिझाइन आणि विकास प्रकल्प प्रगत टप्प्यात कार्यरत आहेत, अशी माहिती देखील संरक्षणमंत्र्यांनी दिली.

लवकरच भारताच्या व्यापारी जहाजांच्या ताफ्याची बांधणी देखील पूर्णपणे देशातच केली जाईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

भारतीय जहाजबांधणी यार्ड हे भारताच्या उदयोन्मुख नील अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण प्लॅटफॉर्म्स व्यतिरिक्त, समुद्राचे अधिक सखोल वैज्ञानिक ज्ञान मिळवण्यासाठी, सागरी परिसंस्थेतील देखरेख मजबूत करण्यासाठी, मत्स्यपालनाचा शाश्वत वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताच्या विस्तृत किनारपट्टीवर व विशेषत्वाच्या आर्थिक क्षेत्रात सागरी कायद्याची अंमलबजावणी क्षमता वाढवण्यासाठी अनेक विशेष जहाजांची रचना आणि बांधणी केली जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2194179) Visitor Counter : 10