संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण सचिवांनी मध्यवर्ती क्षेत्रातील सीमावर्ती भागाला दिली भेट

Posted On: 17 NOV 2025 10:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025

 

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यवर्ती क्षेत्रातील सीमावर्ती भागाचा सर्वंकष दौरा केला.

या निमित्ताने संरक्षण सचिवांनी पिथौरागढला भेट दिली. या भेटीत उत्तर भारत क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग  आणि 119 (I) इन्फंट्री ब्रिगेड ग्रुपचे कमांडर यांनी संरक्षण सचिवांना प्रमुख अभियानविषयक बाबींची तपशीलवार माहिती दिली.

नावीडांगला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित बटालियन कमांडर आणि सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रोजेक्ट हिराकच्या मुख्य अभियंत्यांशी संवाद साधला. त्यांनी संरक्षण सचिवांना कार्यान्वयनाशी संबंधित विविध पैलू, तसेच धोरणात्मक दळवळणीय क्षमतांचा विस्तार करण्याच्या तसेच राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्याच्या उद्देशाने सीमा भागात सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली. या भेटीदरम्यान संरक्षण सचिवांसोबत सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक देखील उपस्थित होते.

या दौऱ्यातून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती प्रदेशांमध्ये दळणवळणीय परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी, सज्जता वाढवण्यासाठी आणि मजबूत पायाभूत सुविधांचा विकास सुनिश्चित करण्याप्रति केंद्र सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2191063) Visitor Counter : 6