संरक्षण मंत्रालय
गरुड 25: फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलासह द्विपक्षीय हवाई सरावाच्या आठव्या आवृत्तीत भारतीय हवाई दल सहभागी
Posted On:
15 NOV 2025 3:29PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दल (IAF) 16 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान फ्रान्समधील मोंट-दे-मार्सन येथे फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (FASF) सोबत 'गरुड 25 ' या द्विपक्षीय हवाई सरावाच्या 8 व्या आवृत्तीत सहभागी होत आहे. भारतीय हवाई दलाचे पथक 10 नोव्हेंबर 2025 रोजी फ्रान्समध्ये पोहोचले आणि ते Su-30MKl लढाऊ विमानांसह सहभागी होणार आहे.
सरावाच्या इंडक्शन आणि डी-इंडक्शन टप्प्यांसाठी C-17 ग्लोबमास्टर III द्वारे एअरलिफ्ट सपोर्ट पुरवला जात आहे, तर सहभागी लढाऊ विमानांचा पल्ला आणि उड्डाणक्षमता वाढवण्यासाठी IL-78 या हवेतून हवेत इंधन भरणाऱ्या टँकरचा वापर केला जातो.
सरावादरम्यान, IAF चे Su-30MKI विमान फ्रेंच मल्टीरोल लढाऊ विमानांसोबत जटिल सिम्युलेटेड हवाई लढाऊ परिस्थितींमध्ये काम करेल, ज्यामध्ये हवेतून हवेत लढाई, हवाई संरक्षण आणि संयुक्त स्ट्राइक ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले जाईल. या सरावाचे उद्दिष्ट वास्तववादी परिचालनात्मक वातावरणात रणनीती आणि प्रक्रिया सुधारणे, परस्पर शिक्षण सक्षम करणे आणि IAF आणि FASF मधील आंतरकार्यक्षमता वाढवणे आहे.
गरुड 25 हा सराव दोन्ही हवाई दलांमधील व्यावसायिक संवाद, ऑपरेशनल ज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची संधी देखील प्रदान करतो. या सरावातील सहभाग बहुपक्षीय सरावांद्वारे मैत्रीपूर्ण परदेशी हवाई दलांशी रचनात्मकपणे संवाद साधण्याच्या, हवाई ऑपरेशन्सच्या क्षेत्रात परस्पर समज आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या एलएएफच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.




***
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2190427)
Visitor Counter : 4