लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त खासदारांनी वाहिली आदरांजली

Posted On: 14 NOV 2025 6:27PM by PIB Mumbai

 

संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसद सदस्य, माजी सदस्य आणि इतर मान्यवरांनी आज संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांनीही पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली.

05 मे 1966 रोजी संविधान सदनाच्या (तत्कालीन संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तैलचित्राचे  अनावरण करण्यात आले होते.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190205) Visitor Counter : 10