ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकार मान्यताप्राप्त चाचणी केंद्रे (GATCs) म्हणून ओळख मिळविण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाकडून ऑनलाइन पोर्टलद्वारे मागवले अर्ज

Posted On: 12 NOV 2025 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्हेंबर 2025

 

सरकारी मान्यताप्राप्त चाचणी केंद्र म्हणून ओळख मिळविण्यासाठी खाजगी उद्योग, प्रयोगशाळा आणि चाचणी सुविधा देणाऱ्या संस्थांना अर्ज करता यावेत यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. https://doca.gov.in/gatc या अधिकृत पोर्टलवर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.

व्यापारात अचूकता, पारदर्शकता आणि नि:ष्पक्षता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, भारतात वजन आणि मापांसाठी पडताळणी  करणाऱ्या संस्था आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राहक व्यवहार विभागाने  सरकार मान्यताप्राप्त कायदेशीर मापन  चाचणी केंद्र नियम, 2013 अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला असून त्यात 23 ऑक्टोबर 2025 रोजी सुधारणा करण्यात आल्या.

यामुळे खाजगी क्षेत्राचा यातील सहभाग सक्षम झाला असून, पुरेशा सुविधा असलेल्या उद्योगांना भारताच्या विस्तारणाऱ्या पडताळणी परिसंस्थेचा आता  भाग बनता येते शक्य झाले  आहे. या सुधारणेद्वारे, खाजगी प्रयोगशाळा आणि उद्योग आता व्यवहार आणि संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या वजन आणि मापन यंत्रांच्या पडताळणीमध्ये सहभागी होऊ शकतील.

पडताळणी क्षमता सुधारणे, प्रतीक्षा वेळ कमी करणे आणि व्यापार आणि ग्राहकांसाठी दर्जेदार पडताळणी सेवा सुनिश्चित करणे हे उद्देश या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून प्रतिबिंबित होतात.चाचण्यांसाठी योग्य उपकरणे, कॅलिब्रेशन सुविधा आणि पात्र कर्मचारी असलेल्या संस्थांना ‘GATC’  मान्यतेसाठी अर्ज करण्यास आमंत्रित केले जात  आहे. 

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा उद्देश डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे व्यावसायिकांना अर्ज करणे सोपे जावे आणि जलद, पारदर्शक मंजुरी प्राप्त करणे शक्य व्हावे हा आहे.

मान्यताप्राप्त GATCs ही केंद्रे 18 प्रकारच्या वजन आणि मापन यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अधिकृत केली जातील, ज्यात पुढील सूचीतील उपकरणांची पडताळणी करणे समाविष्ट आहे:

  1. जलमापक यंत्र मीटर
  2. ब्लडप्रेशर मापन यंत्र
  3. तापमापक यंत्र
  4. रेल्वेचे स्वयंचलित वजनकाटे
  5. टेप पट्टी 
  6. नॉन ऑटोमॅटिक क्लास-थ्री वजन काटे( 150kg वजनापर्यंत)
  7. ऑटोमॅटिक क्लास-थ्री वजन काटे( 150kg वजनापर्यंत)
  8. लोड सेल
  9. बीम स्केल
  10. काऊंटर मशीन                                     
  11. विविध प्रकारचे वजनकाटे
  12. वायू मापन यंत्र 
  13. ऊर्जा मापन यंत्र 
  14. बाष्पमोजन यंत्र 
  15. गाड्यांचा वेग मोजणारे मीटर 
  16. श्वासोच्छ्वास पडताळणी यंत्र 
  17. विविध मोजणी उपकरणे
  18. फ्लो मीटर्स 

 

* * *

सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189329) Visitor Counter : 14