अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ठाणे येथील विमा लोकपाल कार्यालयात 11 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला विमा लोकपाल दिन करण्यात येणार साजरा

Posted On: 10 NOV 2025 8:24PM by PIB Mumbai

मुंबई , 10 नोव्हेंबर 2025

ठाणे येथील विमा लोकपाल कार्यालयात मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला विमा लोकपाल दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ठाणे (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील टिप टॉप प्लाझा येथे सकाळी 10:00 वाजता सुरू होणार असून तो  दुपारी 02:30 वाजेपर्यंत चालणार आहे. ठाणे कार्यालयाचे कार्यक्षेत्र ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई आणि मुंबईच्या काही भागांमध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये मुलुंड (पूर्व/पश्चिम) आणि एन, एस आणि टी वॉर्डचा समावेश आहे.

विमा लोकपाल संस्था, पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तसेच विमा-संबंधित तक्रारींचे न्याय्य, निष्पक्ष आणि विनामूल्य निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला अर्ध-न्यायिक मंच म्हणून काम करते. जर विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी (GRO) तक्रार नाकारली असेल किंवा ती 30 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित असेल तर पॉलिसीधारक विमा लोकपाल कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल करु शकतात.

तक्रार दाखल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत - अधिकृत संकेतस्थळ www.cioins.co.in द्वारे ऑनलाइन, oio.thane@cioins.co.in वर ईमेलद्वारे, टपालाद्वारे किंवा थेट कार्यालयात प्रत्यक्ष भेटून. विमाधारक व्यक्ती किंवा कुटुंबातील जवळचा सदस्य तक्रार सादर करू शकतात, परंतु एजंट किंवा तृतीय पक्षाला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत या प्रकरणांची ऑनलाइन सुनावणी केली जाते आणि त्यांचे निराकरण केले जाते. विमा लोकपालाने जारी केलेला निर्णय विमा कंपन्यांवर बंधनकारक असतो, आणि त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी 30 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. विमा लोकपालाच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे तसेच तक्रार निवारणासाठी या पारदर्शक आणि ग्राहक-अनुकूल यंत्रणेचा वापर करण्यास पॉलिसीधारकांना प्रोत्साहित करणे हा विमा लोकपाल दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2188541) अभ्यागत कक्ष : 32
Read this releasein: English