कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
2021पासून सुरू केलेल्या, एक महिना कालावधीच्या, विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत, पाच समर्पित वार्षिक स्वच्छता अभियानांद्वारे केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधून इलेक्ट्रॉनिक भंगारसामानासह, विविध भंगाराच्या वस्तूंच्या विल्हेवाटीतून 4085 कोटी आणि 24 लाख रुपये महसूल मिळाल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती
Posted On:
09 NOV 2025 5:52PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणूउर्जा विभाग, अवकाश विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र प्रसार यांनी आज माहिती दिली की, 2021पासून सुरू केलेल्या, एक महिना कालावधीच्या, विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत, पाच समर्पित वार्षिक स्वच्छता अभियानांद्वारे केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधून इलेक्ट्रॉनिक भंगारसामानासह, विविध भंगार वस्तूंच्या विल्हेवाट लावण्यातून रु. 4085 कोटी आणि 24 लाख रुपये महसूल मिळाला आहे.
विशेष स्वच्छता मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे यापूर्वी टाकाऊ सामग्री, तुटके लाकडी सामान, भंगार आदींमुळे अडकून पडली होती अशी 231.75 लाख चौरस फूट जागा उत्पादक वापरासाठी मोकळी झाली.
भंगार सामान विकून मिळालेली 4,085 कोटींहून अधिक रक्कम ही एका मोठ्या अवकाश मोहीम अथवा अनेक चांद्रयान अवकाश मोहिमांचे वित्तीय अंदाजपत्रक असू शकते, तर मोकळी झालेली जागा आर्थिक कार्यकृतींसाठी एक मोठी बाजारपेठ इमारत अथवा मोठा मॉल उभारण्यासाठी पुरेशी ठरू शकते.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2188102)
Visitor Counter : 5