पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमओआयएलने ऑक्टोबरमधले आतापर्यंतचे सर्वोच्च उत्पादन नोंदविले

Posted On: 05 NOV 2025 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025


मॅगनीज  क्षेत्रातील  एमओआयएल अर्थात मॉयलने ऑक्टोबर 2025 मध्ये 1.60 लाख टन मॅंगनीज धातूचे उत्पादन नोंदवले आहे. हे उत्पादन कंपनीची  स्थापना झाल्यापासून ऑक्टोबर महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन असून  गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 9.1% अधिक आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सात महिन्यांत, कंपनीने 11.04 लाख टन उत्पादन नोंदवले आहे, जे गतवर्षीच्या याच कालावधीपेक्षा 8.5% जास्त आहे.

खननकर्मावर आपले लक्ष केंद्रित करत, मॉयलने एप्रिल-ऑक्टोबर 2025 या कालावधीत 57,275 मीटरचे आतापर्यंतचे सर्वोच्च एक्सप्लोरेटरी कोर ड्रिलिंग साध्य केले आहे.

या कामगिरीबद्दल बोलताना, मॉयलचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार सक्सेना म्हणाले, "पहिल्या सात महिन्यांत उत्पादनात चढता कल राखला गेल्याचे अत्यंत उत्साहवर्धक आहे. चालू आर्थिक वर्षात आणखी एक प्रभावी कामगिरी नोंदवण्यासाठी मॉयल समूह पूर्णपणे सज्ज आहे."


निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2186689) Visitor Counter : 10