भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला उपस्थित राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2025 ची केली सुरुवात
Posted On:
04 NOV 2025 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
- भारतीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयआयडीईएम) येथे आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम (आयईव्हीपी), 2025 सुरू केला.
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी सहभागींशी संवाद साधला.
- फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड आणि कोलंबिया या सात देशांचे एकूण 14 प्रतिनिधी उद्घाटन सत्राला उपस्थित होते.
- सहभागींना ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदार याद्या तयार करणे आणि भारतातील निवडणुकांचे आयोजन यासह निवडणुकांच्या विविध पैलूंवर सादरीकरण केले.
- आयईव्हीपीमध्ये मध्ये 5-6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बिहारचा दोन दिवसांचा दौरा समाविष्ट असून, यामध्ये सहभागी ईव्हीएम वितरण केंद्रांना भेट देतील आणि 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदानाचे साक्षीदार होतील.
- आयईव्हीपी हा इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था (ईएमबी) आणि आंतरराष्ट्रीय संघटनांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गुंतवणूकीसाठीचा भारतीय निवडणूक आयोगाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
- 2014पासून, आयईव्हीपीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताच्या निवडणूक प्रणालीचे सामर्थ्य प्रदर्शित केले जात असून, निवडणुका घेण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती दिली जात आहे.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186478)
Visitor Counter : 6