कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
Posted On:
29 OCT 2025 4:11PM by PIB Mumbai
मुंबई, 29 ऑक्टोबर 2025
देशभरात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह 2025 साजरा केला जात आहे. "दक्षता: आपली सामायिक जबाबदारी" या सप्ताहाची मुख्य संकल्पना आहे.केंद्रीय दक्षता आयोगाने आयोजित केलेल्या या सप्ताहात सर्व सार्वजनिक क्षेत्रांमध्ये सचोटी, पारदर्शकता आणि दायीत्वाला प्रोत्साहन दिले जाते. या सप्ताहात आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये शासकीय अधिकारी आणि नागरिकांना सहभागी करून घेऊन जागरूकता वाढवणारे प्रतिज्ञा समारंभ, चर्चासत्रे यांचा समावेश आहे.
या सप्ताहाचा एक भाग म्हणून, आयोग 31 ऑक्टोबर 2025 रोजी "नीतिमान प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करेल. या कार्यशाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञान नीतिमान प्रशासन चौकट बळकट करण्यात कशी मदत करू शकते यावर चर्चा होईल.
या सप्ताहामध्ये भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी सामूहिक वचनबद्धतेवर भर दिला जातो तसेच सार्वजनिक जीवनात नीतिमत्ता आणि दक्षतेचे महत्त्व अधोरेखित केले जाते.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai