नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाइम वीक -2025’ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'जहाज क्षेत्रामध्‍ये वित्तपुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणा' केल्या अधोरेखित


सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या भारतातील सागरी क्षेत्रामध्‍ये गुंतवणूकीच्या विशाल संधी : नितीन गडकरी

Posted On: 27 OCT 2025 7:17PM by PIB Mumbai

मुंबई, 27 ऑक्टोबर 2025

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत आयोजित 'इंडिया मेरीटाईम वीक 2025' मध्ये "जहाज क्षेत्रामध्‍ये वित्तपुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणा" या विषयावर संबोधित केले.  

याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अधोरेखित केले की, सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या (84 लाख कोटी रु) भारतातील सागरी क्षेत्रामध्‍ये बंदरे, जहाज वाहतूक आणि लॉजीस्टीक  यामध्ये प्रचंड गुंतवणूक क्षमता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, टोल ऑपरेट ट्रान्स्फर,खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून म्हणजेच ‘पीपीपी’ मॉडेल्सद्वारे 1.4 लाख कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले आहे. यामध्‍ये  खाजगी सहभाग 10 % वरून 35% पर्यंत वाढवला आहे असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले. असा दृष्टीकोन    प्रकल्प अंमलबजावणीला गती देऊ शकतात, तसेच  गुणवत्ता सुधारणे शक्य होते, असे सांगून मंत्री गडकरी म्हणाले, खाजगी क्षेत्रातील नवोपक्रम आणि कार्यक्षम निधी ओघाद्वारे  सरकारवरील आर्थिक भार कमी केला जावू  शकतो. त्यांनी “एकात्म  महासागर, एक सागरी दृष्टीकोन : भारताचे सागरी झेप  ” या शीर्षकांतर्गत तयार करण्‍यात आलेला सीएमईजी (आरआयएस) – ‘इंडिया मेरीटाइम रिपोर्ट 2025-26’ जारी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून तयार करण्‍यात आलेला सागरमाला 2.0  उपक्रम  पुढे नेल्याबद्दल नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे कौतुक केले. जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापराला चालना,  बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच  किनारी भागाची  अर्थव्यवस्था मजबूत करणे त्याचबरोबर अंतर्गत जलमार्गांचे  पुनरुज्जीवन करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. 

खाजगी नवोपक्रम, पारदर्शक प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीमुळे भारत आपल्या सागरी नेतृत्वावर  आणि स्पर्धात्मकतेवर कायमस्वरूपी जागतिक विश्वास निर्माण करू शकतो, यावर गडकरी यांनी यावेळी  भर दिला.

निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2183074) Visitor Counter : 28