वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद (बीआयआरसी) 2025;  जागतिक तांदूळ पुरवठा श्रृंखलेमध्‍ये भारताचे करणार नेतृत्व


बीआयआरसी  2025 मध्ये 1.80  लाख कोटी रुपयांच्या नवीन तांदूळ बाजारपेठा खुल्या होणार  ; परिषदेत 25,000 कोटी रुपयांचे निर्यात सामंजस्य करार अपेक्षित

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीने  परिषदेत स्थानिक तांदळाच्या जातींचे प्रदर्शन

Posted On: 24 OCT 2025 5:19PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या  वाणिज्य विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेचे (बीआयआरसी ) 2025 आयोजन करण्‍यात येणार आहे.

विकसित  भारत @2047  च्या दृष्टिकोनाशी सुसंगत जागतिक व्यासपीठ म्हणून  या  परिषदेत जागतिक तांदूळ व्यापारात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लवचिकता मजबूत करण्यासाठी उत्पादक, निर्यातदार, आयातदार, धोरणकर्ते, वित्तपुरवठादार, वाहतूक व्यवस्‍थेतील भागीदार , संशोधन संस्था आणि संबंधित सेवा प्रदात्यांना एकत्र आणण्‍यात  येणार आहे.  शाश्वतता, नवोन्मेष आणि पारदर्शक, नियमांवर आधारित वाणिज्य हे विषय या परिषदेतील  चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

आज नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद (बीआयआरसी ) 2025 च्या पूर्वावलोकन कार्यक्रमाला संबोधित करताना, ‘अपेडा’चे अध्‍यक्ष  अभिषेक देव यांनी माहिती दिली की फिलीपिन्स, घाना, नामिबिया आणि गांबियाचे परराष्ट्र मंत्री या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या तांदूळ  उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक आहे, भारत  172 पेक्षा जास्त देशांना  तांदळाचा पुरवठा करतो. म्हणूनच, बीआयआरसी 2025  हा कार्यक्रम भागधारकांना जागतिक अन्न पुरवठा साखळीत त्यांची उपस्थिती दर्शविण्याची संधी प्रदान करीत आहे.

परिषदेमध्‍ये 3,000 हून अधिक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ), 80 हून अधिक देशांमधील एक हजाराहून अधिक परदेशी खरेदीदार आणि 2,500 निर्यातदारभात तयार करणारे मिलमालक, आणि भात  संबंधित उद्योग चालक  कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

वर्ष 2024-25 मध्ये भारताने सुमारे  47दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर  जवळपास 47 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन केले.  हे जागतिक तांदूळ उत्पादनाच्या सुमारे 28 टक्के आहे. सुधारित बियाणे जाती, चांगल्या कृषी पद्धती आणि विस्तारित सिंचन व्याप्तीमुळे सरासरी उत्पादन 2014-15 मध्ये प्रति हेक्टर 2.72 टनांवरून 2024-25 मध्ये सुमारे 3.2 टन प्रति हेक्टर झाले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, भारताने अंदाजे 12.95 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंमतीचा 20.1 दशलक्ष मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला .  हा तांदूळ  जगभरातील  172 हून अधिक देशांमध्ये पोहोचला.

जागतिक अन्न प्रणालींमध्ये तांदळाचे महत्त्व अधोरेखित करताना, बीआयआरसी  2025 अधोरेखित केले आहे  कीतांदूळ हा जागतिक अन्न सुरक्षेचा कणा आहे, 1961  पासून उत्पादन तिप्पट झाले आहे – तांदळाचे उत्पादन 216 दशलक्ष टनांवरून जवळजवळ 776 दशलक्ष टन झाले आहे. चार अब्जाहून अधिक लोक उदरनिर्वाह आणि उत्पन्नासाठी तांदळावर अवलंबून आहेत आणि 100 हून अधिक देशांमध्ये अंदाजे 150 दशलक्ष लहान शेतकरी( अल्प भूधारक)  हे पीक घेतात. जागतिक तांदूळ उद्योगाचे मूल्य सुमारे  330 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. यामुळे तांदूळ हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यापार होणारे खाद्यान्न बनले आहे.

या परिषदेत शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्राचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी कृषीशास्त्र, सिंचन, प्रमाणन आणि  नवकल्पनांचा शोध घेवून त्यावर  चर्चा केली जाईल.

बीआयआरसी 2025 मध्ये विविध विषयांनुसार  क्रियाकलाप आणि सत्रांचा समावेश असेल.

भारतीय तांदळाच्या जाती लक्ष्यित पाककृतींमध्ये अधिकृत , उच्च-कार्यक्षमतेला  पर्याय आहेत, हे दाखवून देणेया कार्यक्रमाचे उद्दिष्ट  आहे. यामुळे  नवीन बाजारपेठांचा शोध घेवून त्यामध्‍ये तांदळाचे 1.80 लाख कोटी रूपयांचे व्यवहारांचे  लक्ष्‍य ठेवले आहे. त्याचबरोबर 25,000 कोटी रूपयांचे  निर्यात सामंजस्य करार करण्‍यासाठी भारताची तांदूळ बाजारपेठ  उत्प्रेरक घटक आहे, हे दर्शविण्‍याचाही उद्देश्‍य आहे.

***

सुषमा काणे / सुवर्णा बेडेकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2182333) Visitor Counter : 20