भारतीय निवडणूक आयोग
बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी
Posted On:
18 OCT 2025 12:35PM by PIB Mumbai
1.भारतीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि 8 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
2.बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 6 नोव्हेंबर 2025 (गुरुवार) आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) या मतदानाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत तर सर्व 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहेत.
3. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या, कलम 135 ब नुसार, कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत काम करणाऱ्या आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी दिली जाईल.
4.अशाप्रकारे वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही मालकाला (नियोक्त्याला) दंड आकारला जाईल. सर्वकामगारांना त्यांचे दैनिक वेतन आणि अनियमित (कॅज्युअल) कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे.
5.जे मतदार (कॅज्युअल आणि दैनंदिन वेतन कामगारांसह) त्यांच्या मतदारसंघाबाहेरील औद्योगिक किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करतात किंवा नोकरी करतात परंतु मतदान होणाऱ्या मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत त्यांनाही मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीचा लाभ मिळेल, जेणेकरून ते मतदान करू शकतील,असे आयोगाने पुढे स्पष्ट केले आहे.
6.आयोगाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांना या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी आणि सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार मुक्तपणे आणि सोयीस्करपणे वापरता येईल, याची खात्री करण्यासाठी आवश्यक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
***
हर्षल अकुडे / संपदा पाटगावकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2180679)
Visitor Counter : 12