वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनआयएफटी- मुंबई येथील नव्या शैक्षणिक वास्तूचे वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांच्या हस्ते उद्घाटन


एनआयएफटी- मुंबईच्या दीक्षांत समारंभामध्‍ये मुंबईच्या 312, तसेच दमणमधील 29 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान

"पीएम मित्र पार्क, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान, शाश्वतता तसेच जागतिक स्पर्धात्मकतेवर भर देण्यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे, भारताचा वस्त्रोद्योग आणि फॅशनमध्ये जागतिक नेता म्हणून उदय’’ - राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा

Posted On: 15 OCT 2025 9:27PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑक्टोबर  2025

मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने नवनिर्मित शैक्षणिक वास्तूचे उद्घाटन आज करण्‍यात आले. तसेच एनआयएफटीच्या पदवीधर गटाचा  दीक्षांत समारंभ पार पाडला.  या कार्यक्रमाला परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते खारघर परिसरामधील एनआयएफटीची नवीन शैक्षणिक वास्‍तूमधील 1,2,3  क्रमांकाच्या इमारती  आणि बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन करण्‍यात आले.

आज झालेल्या कार्यक्रमामुळे  एनआयएफटी – मुंबई शाखा म्हणजे  उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि प्रगत शिक्षण स्थान बनल्याचे  प्रतिबिंबित होते.   भारतातील एक प्रमुख फॅशन संस्था म्हणून आता या संस्थेचा  दर्जा उंचावला आहे. या नवीन वास्तूमध्ये विशेष सुविधांसह वर्गखोल्या, अत्याधुनिक प्रयोगशाळा, बहुउद्देशीय स्थळ आणि पाचशे आसनक्षमतेचे अत्याधुनिक सभागृह आहे.एकूण 8,352.12  चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे सुधारित शैक्षणिक संकुल विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी प्रेरणादायी वातावरण प्रदान करणारे आहे. तसेच  सर्जनशीलता आणि शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देणारे आहे.

यावेळी मंत्री पवित्रा यांनी नवीन शैक्षणिक ब्लॉकसाठी स्मारक फलकाचे अनावरण केले आणि तांत्रिक वस्त्रोद्योग प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांनी भरवलेले  प्रदर्शन पाहिले. त्यांच्या उपस्थितीने डिझाइन आणि नवोपक्रमात भविष्यातील नेत्यांना घडवण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.

या प्रसंगी बोलताना मंत्री म्हणाल्या, "नवोपक्रम आणि सर्जनशीलतेची  संस्कृती एनआयएफटी मुंबई आणि एनआयएफटी  दमण सातत्याने  जोपासत आहेत.  अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कुशल प्राध्यापक आणि उत्साही विद्यार्थी समुदायासह, दोन्ही शैक्षणिक परिसरातील आणि देशातील  काही सर्वात प्रतिष्ठित डिझाइन संस्था म्हणून नावाजल्या आहेत."

दीक्षांत समारंभात एनआयएफटी मुंबईतील 312 आणि एनआयएफटी दमणमधील 29 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या पदवीधरांना त्यांच्या कामगिरी आणि सर्जनशीलतेसाठी गौरवण्यात आले. संस्थेने उत्कृष्ट विद्यार्थ्यांना उत्कृष्‍ट  सेवा पुरस्कार, वर्षभरात सर्वोत्कृष्‍ट कार्य करणारा विद्यार्थी पुरस्कार, सर्वोत्तम शैक्षणिक पुरस्कार, सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, सर्वात नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील डिझाइन संग्रह पुरस्कार आणि सर्वोत्तम पदवी प्रकल्प पुरस्कार असे सन्मान देऊन विद्यार्थ्‍यांचा गौरव करण्‍यात आला.

व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला. एनआयएफटी- मुंबईचे संचालक खुशाल जांगिड,  एनआयएफटी दमणचे संचालक ब्रिजेश देवरे , एनआयएफटी चे महासंचालक तनु कश्यप,  एनआयएफटी- दमणचे विधुशेखर पी. आणि कव्हर स्टोरी क्लोदिंग लिमिटेडच्या सीईओ आणि एनआयएफटीच्या माजी विद्यार्थिनी मंजुळा तिवारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी एनआयएफटी मुंबईच्या असोसिएट प्रोफेसर सुस्मिता दास आणि एनआयएफटी गांधीनगरच्या असोसिएट प्रोफेसर अमिषा मेहता यांना त्यांच्या विद्वत्तापूर्ण उत्कृष्टतेचा सन्मान करत पीएचडी पदवी प्रदान केली.

मंत्री पुढे म्हणाले, "आज फॅशनचे जग एका परिवर्तनातून जात आहे - व्यावसायिक यशापासून ते जाणीवपूर्वक निर्मितीकडे आणि शाश्वतता, नैतिक फॅशन आणि  डिझाइनकडे आता लक्ष केंद्रित केले जात आहे.   भारताच्या कापड वारशाचा पुनर्शोध घेण्‍याची अभिमानास्पद कामगिरी केली जात  आहे - नैसर्गिक रंगकाम आणि हाताने विणकाम ते पुनर्वापर आणि शून्य-कचरा टेलरिंग यावर भर दिला जात आहे.  जागतिक संवेदनशीलतेसह पारंपरिक कौशल्यांचे मिश्रण असल्यामुळे आज भारतीय डिझाइनकडे जगातील सर्व स्‍तरातून कौतुकाच्या नजरेने पाहिले जाते."

जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रगतीशील सुविधांद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी एनआयएफटी मुंबईच्या समर्पणाला आणखी पुष्टी देतो, त्‍याच बरोबर आज झालेला कार्यक्रम हा संस्थेच्या दृष्‍टीने मैलाचा दगड ठरला.


शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2179688) Visitor Counter : 4
Read this release in: English