भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेतर्फे जिओट्रेसेस वैज्ञानिक सुकाणू समितीच्या बैठकीचे आयोजन, 35 देशांच्या सदस्यांचा सहभाग

Posted On: 15 OCT 2025 9:47PM by PIB Mumbai

पणजी, 15 ऑक्टोबर 2025

गोवा येथील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने (एआयओ) त्यांच्या पणजीतील दोना पावला येथील संकुलात 20 व्या  जिओट्रेसेस वैज्ञानिक सुकाणू समितीच्या (एसएससी) बैठकीचे आयोजन केले आहे. 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विविध देशांतील 20 सदस्य उपस्थित आहेत तर 15 सदस्य ऑनलाइन सहभागी होत आहेत.

जिओट्रेसेस हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून जैव-भू-रासायनिक चक्रांविषयी अवगत होण्याबरोबरच सागरी वातावरणात सूक्ष्म मूलद्रव्यांचे आणि त्यांच्या समस्थानिकांचे मोठ्या प्रमाणात वितरण सुधारण्याचा त्याचा उद्देश आहे. सर्व प्रमुख महासागर खोऱ्यांच्या अध्ययनासाठी संरचित या कार्यक्रमात 35 राष्ट्रांचे शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.

या बैठकीबद्दल माहिती देताना, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन म्हणाले की, एसएससी बैठकीत सागरी पर्यावरणावरील चालू अभ्यासांवर विचारमंथन होऊन जिओट्रेससाठी भविष्यातील कृती योजना आखल्या जातील. "महासागर विशाल असून त्यात सूक्ष्मजीव पटल आणि आयनसारखे काही लहान कण आहेत जे सागरी वातावरणात महत्त्वाचे आहेत. जिओट्रेस कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या अध्ययनात या सूक्ष्म कणांवर आणि इतर विविध जीवांवर संशोधन समाविष्ट आहे," असे ते म्हणाले.

"एनआयओ हिंद महासागर क्षेत्रातील विविध प्रक्रियांचा तसेच हे सूक्ष्म पोषक घटक प्रवाह आणि त्यांच्या मार्गांवर कसे जातात याचा अभ्यास करत आहे. हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे, जो महासागरातील सूक्ष्म मूलद्रव्य आणि समस्थानिकांच्या अभ्यासावर केंद्रित आहे," याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एनआयओचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह म्हणाले की, या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, जगभरातील सूक्ष्म मूलद्रव्य आणि समस्थानिकांच्या निरीक्षणाचे संकलन केले जाते. “आम्ही नंतर या विषयावरील आमची माहिती एकत्रित करू जेणेकरून हे घटक बाहेरून महासागरात कसे येतात आणि त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया होऊन एकत्रित केले जात आहेत आणि संपूर्ण महासागरात कसे वाहून नेले जात आहेत हे समजून घेता येईल. भारत सरकार आता या अभ्यासांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहे कारण हे निष्कर्ष आपल्याला दूरदृष्टीने सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत करतात,” असे त्यांनी निदर्शनास आणले.

एसएससी फॉर जीओट्रेसेसचे सह-अध्यक्ष आणि युनायटेड किंग्डममधील लिव्हरपूल विद्यापीठाचे प्राध्यापक अलेस्सांद्रो टॅग्लियाब्यू म्हणाले की, टीमला हिंदी महासागराबद्दल अवगत करण्यासाठी भारताने या कार्यक्रमात मोठी जबाबदारी पेलली आहे. “भारताचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. जीओट्रेसेसमध्ये भारताच्या योगदानाशिवाय, येथील हिंदी महासागर प्रक्रियांबद्दलचे आमचे ज्ञान खूपच तोकडे पडले असते,” असे त्यांनी नमूद केले.

एनआयओ ने याआधी 2012 मध्ये जिओट्रेसेस एसएससी बैठक आयोजित केली होती. 

जिओट्रेसेस कार्यक्रमासाठी देखरेख आणि समर्थन प्रदान करणारी आंतरराष्ट्रीय संस्था, वैज्ञानिक महासागर संशोधन समिती (एससीओआर) ही जिओट्रेसेस ला त्यांच्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय महासागर संशोधन प्रकल्पांपैकी एक म्हणून देखरेख करते. एससीओआर जिओट्रेसेस अंतर्गत सहभागी देशांमधील संशोधन उपक्रमात समन्वय साधण्यास आणि कार्यक्रमाच्या वार्षिक अहवालांचे पुनरावलोकन करण्यास देखील मदत करते.

शैलेश पाटील/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2179685) अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein: English