नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नितेश राणे यांनी आयएमडब्ल्यू 2025 च्या तयारीचा घेतला आढावा
“भारताच्या सागरी क्षेत्रात 2047 पर्यंत 8 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यामुळे 1.5 कोटी नवीन रोजगार निर्माण होतील”: सर्वानंद सोनोवाल
“भारत सागरी सप्ताह 2025 मध्ये देशाच्या जागतिक सागरी नेतृत्व महत्त्वाकांक्षेसाठी मार्गदर्शक आराखडा सादर केला जाईल”: सर्वानंद सोनोवाल
“आयएमडब्ल्यू 2025 मध्ये महानगर मुंबई जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणार, शक्यता वाढवणार ”: सर्वानंद सोनोवाल
“आयएमडब्ल्यू 2025 मध्ये सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, जपान आणि डेन्मार्क यांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाची उपस्थिती”: सर्वानंद सोनोवाल
Posted On:
14 OCT 2025 9:40PM by PIB Mumbai
मुंबई, 14 ऑक्टोबर 2025
मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या आगामी भारत सागरी सप्ताह (इंडिया मेरीटाईम वीक) 2025 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे उपस्थित होते
मुंबईत मंत्रालयात आगामी भारत सागरी सप्ताह 2025 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे उपस्थित होते. भव्य सागरी कार्यक्रमाची निर्बाध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्थळाची सज्जता , सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि हितधारकांबरोबर समन्वयाचा त्यांनी आढावा घेतला. हा भव्य कार्यक्रम मुंबईला सागरी नवोन्मेष , गुंतवणूक आणि सहकार्याचे जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळवून देणार आहे. या भव्य कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी 'इंडिया मेरीटाईम वीक'मध्ये उपस्थित राहणार असून ते ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरममध्ये बीज भाषण देतील. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

आढावा बैठकीनंतर आज नेस्को प्रदर्शन केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समाधान व्यक्त केले आणि म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली, आम्ही देशातील बंदरे, जहाज वाहतूक आणि लॉजिस्टिक्स परिसंस्था लवचिक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज बनवण्यासाठी काम करत आहोत. यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी व्यापक संधी खुल्या होतील ज्यामध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा सागरी गुंतवणूक मार्गदर्शक आराखडा समाविष्ट आहे. आयएमडब्ल्यू 2025 हे एक असे व्यासपीठ असेल जिथे कल्पना प्रकल्पांमध्ये आणि वचनबद्धता भागीदारीत रूपांतरित होऊ शकते. भारत समृद्ध, शाश्वत आणि समावेशक सागरी भविष्याच्या दिशेने सहकार्य आणि नेतृत्व करण्यास सज्ज आहे."
याप्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी सागरी क्षेत्रासाठी सरकारच्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली आणि ‘आयएमडब्ल्यू 2025 ‘ च्या धोरणात्मक उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली. सोनोवाल यांनी जागतिक सागरी भागीदारी मजबूत करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि या क्षेत्रात नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला.
066L.jpeg)
"वर्ष 2047 पर्यंत सागरी क्षेत्रामध्ये भारताला जागतिक नेतृत्व करता आले पाहिजे, या दिशेने वाटचाल करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. यासाठी 8 ट्रिलियन रुपयांची नियोजित गुंतवणूक आणि 1.5 कोटी रोजगार निर्मितीचा समावेश आहे,” असे सर्वानंद सोनोवाल म्हणाले. “आमचा सागरी अमृतकाळाचे स्वप्न, समृद्धी, शाश्वतता आणि आपल्या सागरी वारशाच्या अभिमानावर आधारित आहे; आणि हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 च्या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे.”
या स्वप्नाचे आधीच परिणामांमध्ये रूपांतरित होत आहे. 2014 पासून अंतर्देशीय जलमार्गांवर मालवाहतूक आठ पटीने वाढली आहे, प्रमुख बंदरांवर ‘टर्नअराउंड’ म्हणजे माल उतरवून किंवा चढवून परतण्याचा कालावधी 60% नी कमी झाला आहे आणि 5.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा सागरमाला प्रकल्प किनारपट्टीवरून होणा-या वाहतुकीला आकार देत आहेत. भारत आता जगातील 12% खलाशांचा पुरवठा करतो, यावरून सागरी कार्य कौशल्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर भारत आघाडीवर आहे तसेच नेतृत्व करण्याची भारताची क्षमता दिसून येते. 2047 पर्यंत सर्व 12 प्रमुख बंदरे पूर्ण ‘कार्बन न्युट्रीलिटी ’ साध्य करण्यासाठी सज्ज झाली आहेत आणि 2035 साठी हरित ऊर्जा संक्रमण लक्ष्य गाठण्यासाठी कामे आधीच सुरू आहेत, त्यामुळे शाश्वत आणि तंत्रज्ञान-चालित सागरी भविष्याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे.

याप्रसंगी बोलताना सर्वानंद सोनोवाल यांनी अधोरेखित केले की, इंडिया मेरीटाईम वीक (आयएमडब्ल्यू), 2025 मध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणारे एक लाखांपेक्षा जास्त प्रतिनिधी आणि 500 प्रदर्शक सहभागी होणार आहेत. "इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) आणि युनेस्कॅप सारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांसह सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण कोरिया, जपान आणि डेन्मार्कमधील मंत्री स्तरावरील शिष्टमंडळे या कार्यक्रमात सहभागी होतील," असे सर्वानंद सोनोवाल म्हणाले. आघाडीची भारतीय राज्ये - महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू - अदानी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स, कोचीन शिपयार्ड आणि पारादीप पोर्ट अथॉरिटी यासारख्या प्रमुख सागरी क्षेत्रातील उदयोगांचे प्रमुख देखील भाग घेणार आहेत.
F60W.jpeg)
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम,’ इंडिया मेरीटाईम वीक 2025’, सागरी तंत्रज्ञान, बंदर विकास, मालवाहतूक आणि शाश्वत प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करते. भारताच्या सागरी क्षेत्राचे भविष्य आणि जागतिक व्यापार आणि नील अर्थव्यवस्थेच्या वाढीसंबंधी भूमिका घडविण्यासाठी सहकार्य, नावीन्यपूर्णता वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 आणि अमृतकाल मेरीटाईम व्हिजन 2047 अंतर्गत राष्ट्रीय प्राधान्यांचे समर्थन करताना, जागतिक सागरी परिसंस्थेत एक प्रमुख देश म्हणून भारताचे स्थान बळकट होईल, अशी अपेक्षा आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179182)
Visitor Counter : 9