संरक्षण मंत्रालय
आर्मी रेड संघाने 56व्या इंटर सर्व्हिसेस क्राॅस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिंकली
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2025 7:45PM by PIB Mumbai
पुणे, 12 ऑक्टोबर 2025
आयएनएस शिवाजी येथे 12ऑक्टोबर 2025 रोजी 56 वी इंटर सर्व्हिसेस क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा 2025, अत्यंत उत्कृष्टरित्या आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत चार संघांमधून, आर्मी रेड, आर्मी ग्रीन, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल यांचे प्रत्येकी सहा अशा एकूण 24 खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंनी 10 किलोमीटर अंतर धावण्याच्या स्पर्धेत प्रतिष्ठेच्या सैन्यदल अजिंक्यपद करंडकासाठी स्पर्धा केली.
वैयक्तिक गटात पहिला आणि दुसरा क्रमांक भारतीय नौदलाच्या खेळाडूंनी पटकावला:
- 1ला क्रमांक – प्रकाश देशमुख, पीओ (जीडब्ल्यू) – 28 मिनिटे 49 सेकंद
- 2रा क्रमांक – रोहित वर्मा, पीओएलओजी (एमएटी) – 28 मिनिटे 51 सेकंद
- तर आर्मी रेडच्या अंकित नाईक याने 28 मिनिटे 53 सेकंदात शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला.
सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत, आर्मी रेड आणि भारतीय नौदल दोन्ही संघ 25 गुणांसह बरोबरीत होते. चुरशीच्या टाय-ब्रेकरमध्ये आर्मी रेडने इंटर सर्व्हिसेस क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा 2025 जिंकली.
संघानुसार एकूण गुणतालिका पुढीलप्रमाणे:
- आर्मी रेड – 25
- भारतीय नौदल – 25
- आर्मी ग्रीन – 33
- भारतीय वायुदल – 75
आर्मी ग्रीनने तिसरे स्थान मिळवले, तर भारतीय वायुदल चौथ्या स्थानावर राहिले.

6Y4M.jpeg)

TRAG.jpeg)
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178166)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English