कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
विशेष मोहीम 5.0 चा अंमलबजावणी टप्पा (2-31 ऑक्टोबर, 2025)
Posted On:
10 OCT 2025 8:25PM by PIB Mumbai
भारत सरकारने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाला नोडल विभाग म्हणून मान्यता देऊन सुरू केलेल्या विशेष मोहीम 5.0 ला लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान झालेल्या सज्जता टप्प्याच्या यशस्वी पूर्ततेनंतर 2 ऑक्टोबर, 2025 रोजी अंमलबजावणी टप्प्याला सुरुवात झाली असून हा टप्पा 31ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे.
अंमलबजावणी टप्प्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांनी असाधारण उत्साह दाखवत स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने नवोन्मेषी, नागरिक केंद्रित आणि शाश्वत उपक्रम सादर केले.
कचऱ्यापासून कला / कचऱ्यापासून संपत्ती
कचऱ्याचे उपयुक्त निर्मितीमध्ये रूपांतर करणे ही विशेष मोहीम 5.0 अंतर्गत सर्वात नाविन्यपूर्ण संकल्पनांपैकी एक आहे,
ई-कचरा व्यवस्थापन
विशेष मोहीम 5.0 अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापनाला प्रमुख प्राधान्य दिले आहे . या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक साहित्याची जबाबदार विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
स्वच्छता पद्धती
विशेष मोहीम 5.0 मध्ये स्वच्छता केंद्रस्थानी आहे, कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रालयांमध्ये समन्वित प्रयत्न केले जातात.
समावेशकता
समावेशकता आणि महिला सक्षमीकरण यांना विशेष मोहीम 5.0 मध्ये विशेष प्राधान्य दिले असून या मोहिमेद्वारे सार्वजनिक सेवांमधील महिलांच्या नेतृत्त्वाखालील प्रारूपांचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले आहे.
या मोहिमेने व्यापक जनसंपर्क साधण्यातही मोठे यश मिळवले असून, #SpecialCampaign5 या हॅशटॅगखाली 5954 हून अधिक ट्वीट्स, 133 पीआयबी निवेदने आणि इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यम प्लॅटफॉर्मवर व्यापक प्रसिद्धी मिळवली आहे.
***
सुषमा काणे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177641)
Visitor Counter : 7