संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मुंबईत ब्रिटनचे संरक्षण राज्यमंत्री वर्नोन कोकर यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2025 3:46PM by PIB Mumbai
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत ब्रिटनचे संरक्षण राज्यमंत्री (हाऊस ऑफ लॉर्ड्सचे मंत्री) वर्नोन कोकर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. ही बैठक यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुप (सीएसजी) च्या भारत भेटीच्या निमित्ताने झाली.
या बैठकीदरम्यान, दोन्ही पक्षांनी विद्यमान संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला तसेच भारत आणि ब्रिटन यांच्यातील सहकार्य आणखी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या नेतृत्वाखाली यूके सीएसजीने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर भारतीय नौदलासोबत कोकण-25 या द्विपक्षीय सागरी सरावाचा सागरी टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या हा कॅरियर स्ट्राइक ग्रुप मुंबई आणि गोवा येथे बंदर टप्प्यातील उपक्रमांमध्ये सहभागी आहे.
अशा कार्यात्मक संवादांमुळे दोन्ही देशांच्या नौदलांमधील कार्यक्षम ज्ञानाची परस्पर समज वाढते आणि आंतरसंचालन मजबूत होते, यावर संजय सेठ यांनी भर दिला. बैठकीदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतला आणि भारतातील वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतांबद्दल, उपकरण निर्मितीतील आत्मनिर्भरतेबद्दल आणि स्थानिक प्रणालींच्या विकासाबद्दल चर्चा केली. दोन्ही पक्षांनी जागतिक संरक्षण पुरवठा साखळीतील सहकार्य आणि नव्या संधींचा शोध घेऊन सर्व क्षेत्रात संबंध अधिक दृढ करण्याप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच हिंद - प्रशांत क्षेत्रात आणि हिंद महासागर प्रदेशात सागरी सहकार्य मजबूत करण्याची तसेच मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेला पाठिंबा देत नौवहन स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
दोन्ही पक्षांनी ‘भारत - ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2025 मधील ब्रिटन भेटीदरम्यान स्वीकारण्यात आलेले 'भारत-ब्रिटन व्हिजन 2035’ या दस्तऐवजांच्या मार्गदर्शनाखाली घनिष्ठ, बहुआयामी आणि परस्पर हितासाठी संरक्षण भागीदारी बळकट करण्याचा वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
***
सुषमा काणे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177436)
आगंतुक पटल : 23