आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरातील तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी सीसीआरएएस ने स्पार्क– 4.0 ची केली घोषणा


आयुर्वेद पदवी घेत असलेल्या  300 विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी 50,000 रुपये संशोधन शिष्यवृत्ती

प्रविष्टि तिथि: 10 OCT 2025 12:47PM by PIB Mumbai

 

आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (CCRAS) स्पार्क कार्यक्रमाची  (2025-2066)  चौथी आवृत्ती जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतातील पदवी स्तरावरील आयुर्वेद विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती जागृत करणे आहे.

या कार्यक्रमांतर्गत, राष्ट्रीय भारतीय चिकित्सा प्रणाली आयोग (NCISM) द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधील 300 आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया (BAMS) पदवीधर विद्यार्थ्यांना 50,000 रुपये (दोन महिन्यांसाठी दरमहा 25,000 रुपये) शिष्यवृत्ती मिळेल. नोंदणीची प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे.

सीसीआरएएसचे महासंचालक प्राध्यापक रविनारायण आचार्य यांनी सांगितले की, स्पार्क उपक्रम परिषदेच्या आयुर्वेद संशोधन क्षेत्रातील युवकांना संलग्न करून वैज्ञानिक प्रशिक्षण देण्याच्या निरंतर प्रयत्नांचे प्रतिक आहे. या उपक्रमाने शेकडो विद्यार्थ्यांना संशोधनात पहिले पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळाली असून पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील दुवा मजबूत झाला आहे, असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे, आयुर्वेदाच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांमध्ये स्पार्कने लोकप्रियता मिळवली आहे, देशातील 20 राज्यांमधील 289 आयुर्वेद महाविद्यालयातील 591 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अंतिम संशोधन अहवाल यशस्वीरित्या सादर करून त्याची मंजुरी मिळाल्यानंतर प्रमाणपत्र देखील देण्यात येते. पारंपरिक चिकित्सा प्रणालीत भारताची संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी तसेच नवोन्मेष आणि वारसा यांचे एकत्रित करण्यासाठी सीसीआरएएसच्या व्यापक दृष्टिकोनातील स्पार्क4.0 ही आवृत्ती आणखी एक मैलाचा दगड आहे.

अधिक तपशील आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेण्यासाठी, विद्यार्थी पुढे दिलेल्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात

https://spark.ccras.org.in/  

***

सुवर्णा बेडेकर / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2177297) आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil