सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता कर्मींना सुरक्षा उपकरण आणि आयुष्यमान कार्डांचे डॉ. विरेंद्र कुमार यांच्या हस्ते पणजीत वितरण


पर्यटकांचे आकर्षण असलेल्या स्वच्छ, सुंदर अशा गोव्यात स्वच्छता कर्मीचें महत्वपूर्ण योगदान - डॉ. विरेंद्र कुमार

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2025 3:15PM by PIB Mumbai

                                                                                       पणजी, 9 ऑक्टोबर 2025

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने पणजी गोवा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेन्द्र कुमार यांच्या हस्ते नमस्ते योजने अंतर्गत गोव्यातील  स्वच्छता कर्मींना  पीपीई किट,  सुरक्षा उपकरण आणि आयुष्यमान कार्डांचे आज वितरण करण्यात आले.

गोवा हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे, मोठ्या संख्येत पर्यटक इथे येतात. स्वच्छ, सुंदर अशी गोव्याला ओळख देण्यात असंख्य स्वच्छता कर्मीचे महत्वपूर्ण योगदान आहे अशा शब्दात  डॉ. विरेन्द्र कुमार यांनी स्वच्छता कर्मीच्या  कार्याचा गौरव केला. कचरामुक्त आणि स्वच्छ शहर हे आपल्याला स्वच्छता कर्मीमुळे लाभते असे मंत्री महोदय म्हणाले.

2 ऑक्टोबर 2014 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार या  अभियानाचे  अल्पावधीतच जनचळवळीत रूपांतर झाले. स्वच्छतेच्या या अभियानात संपूर्ण देश सहभागी झाला. यातूनच स्वच्छता कर्मीच्या कार्याला प्रतिष्ठा लाभल्याचे डॉ विरेन्द्र कुमार म्हणाले.

पारंपरिक पद्धतीने होणारी स्वच्छतेची कामे आता केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे आधुनिक आणि यांत्रिक पद्धतीने होत असून त्यासाठी अकुशल स्वच्छता कर्मीना  योग्य आणि आवश्यक यांत्रिकी पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने स्वच्छता कर्मीसाठी, त्यांच्यावर आश्रित मुला-मुलीना शिक्षणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.  या योजनांचा लाभ त्यांच्या पर्यन्त पोहचविण्यासाठी सर्व  राज्य सरकारनी जबाबदारी घ्यावी असे आवाहन  सामाजिक न्याय मंत्र्यानी केले. अशा योजनांच्या माध्यमातून समाजाच्या अतिशय महत्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छता कर्मीना सामाजिक न्याय देण्याचा सरकारचा हेतू असल्याचे डॉ विरेन्द्र कुमार म्हणाले.

यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने फॅशन शो च्या माध्यमातून सुरक्षा उपकरणे, यांत्रिक सामुग्री, पीपीई किट यांचा वापर करून स्वच्छता कर्मी काम करत असल्याचे प्रात्यक्षिक मंचावर सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक श्री प्रभात कुमार सिंह, राज्य नोडल अधिकारी श्री बिरजेश मनेकर, उपजिल्हाधिकारी श्री मोहम्मद शाबीर,  सामाजिक न्याय विभागाचे उपसंचालक श्री दौलत सरदेसाई यांच्यासह गोवा राज्यातील स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नाना मेश्राम /आशीष सांगळे /प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2176762) आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी