दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत नवोन्मेषाचे लोकशाहीकरण करत ते प्रत्येक नागरिकासाठी सुलभ करत आहे : डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन भारताला कनेक्टिव्हिटीकडून जागतिक तंत्रज्ञान नेतृत्वाकडे घेऊन जात आहे

प्रविष्टि तिथि: 08 OCT 2025 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025

भारत नवोन्मेषाला एका विशिष्ट प्रयत्नाद्वारे लोकचळवळीत परिवर्तित करत आहे, असे केंद्रीय दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 च्या निमित्ताने "बियॉन्ड कनेक्टिव्हिटी: डेमोक्रॅटायझिंग द इंजिन्स ऑफ टुमॉरोज इनोव्हेशन" या सत्राला संबोधित करताना सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक अशी नवोन्मेष परिसंस्था तयार करत आहे जी समावेशक, सुलभ आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आहे यावर डॉ. चंद्रशेखर यांनी भर दिला. "आम्ही उद्याच्या नवोन्मेषाच्या इंजिनचे लोकशाहीकरण करत आहोत, प्रत्येक भारतीयासाठी ते उपयुक्त बनवत आहोत," असे ते म्हणाले.

"आपण जे साध्य केले आहे ते पद्धतशीरपणे केले आहे. जग भारतावर विश्वास ठेवते कारण भारत स्वतःवर विश्वास ठेवतो. आपण उद्याच्या नवोन्मेषाच्या इंजिनांचे लोकशाहीकरण करत आहोत , प्रत्येक भारतीयासाठी ते उपयोगी बनवत आहोत," असे ते म्हणाले.

गेल्या दशकातील भारताचा नवोन्मेष प्रवास कनेक्टिव्हिटीकडून सर्जनशीलतेकडे एका निर्णायक संक्रमणाचे प्रतीक आहे हे नमूद करत त्यांनी अधोरेखित केले की देश आता जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनला आहे, ज्यामध्ये 1.9 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत, तर पेटंट दाखल करण्याचे प्रमाण दुप्पट झाले असून , 2014 मधील 40,000 वरून 2025 मध्ये 80,000 हून अधिक झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल समावेशनाच्या एका दशकाने जेएएम त्रिसूत्री , 900 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचणारे कमी खर्चिक इंटरनेट आणि यूपीआयच्या 10 अब्जहून अधिक मासिक व्यवहारांच्या माध्यमातून नवोन्मेषाचा पाया रचला आहे, ज्यामुळे प्रत्येक नागरिक जोडला जाण्यात , निर्मिती करण्यात आणि योगदान देण्यात सक्षम झाला आहे असे ते म्हणाले . चंद्रयान-3, स्वदेशी 4G/5G, मेड-इन-इंडिया एमआरआय आणि संरक्षण निर्यातीत 30 पट वाढ ही कामगिरी भारताचे ते तंत्रज्ञान सामर्थ्य आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने त्याचा प्रवास दर्शवते.

डॉ. चंद्रशेखर यांनी नमूद केले की जीएसटी, दिवाळखोरी आणि नादारी संहिता, कामगार कायद्यांचे सरलीकरण आणि पूर्वलक्षी कर रद्द करणे यासारख्या सुधारणांमुळे पारदर्शक, गुंतवणूकदार-स्नेही वातावरण निर्माण झाले आहे. "भारत परवाना राज कडून विश्वास-प्रथम मॉडेलकडे वळला आहे, उद्योजकांना राष्ट्र-निर्माते म्हणून सन्मानित करत आहे," असे ते म्हणाले.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2176339) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil