संरक्षण मंत्रालय
पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर ‘सराव कोकण - 2025’ ला प्रारंभ
Posted On:
05 OCT 2025 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही (ब्रिटिश नौदल) यांच्यातील द्विपक्षीय सराव ‘अभ्यास कोंकण - 2025 ऑक्टोबर पासून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरू झाला आहे. गेल्या दोन दशकांत, या सरावाची व्याप्ती आणि व्यामिश्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. हा सराव 05 – 12 ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यांत आयोजित केला जाईल.
बंदरातल्या टप्प्यात नौदल कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक संवाद, जहाजांवर क्रॉस डेक भेटी, क्रीडा सामने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, संयुक्त कार्यकारी गट बैठका आणि विषय विशेषज्ञ देवाणघेवाणसुद्धा होणार आहे.
या सरावात दोन्ही सहभागी देश विमानवाहू नौका, विनाशिका, फ्रिगेट्स, पाणबुड्या तसेच जहाजांवरील आणि किनाऱ्यावरील हवाई संपत्ती सहभागी करतील.

नॉर्वे आणि जपान च्या युद्धनौकांचा समावेश असलेल्या,एसएमएस प्रिन्स ऑफ वेल्सच्या नेतृत्वाखालील यूके कॅरियर स्ट्राईक ग्रुप 25 च्या सहभागामुळे या वर्षीच्या सरावाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारताचे नेतृत्व स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या कॅरियर बॅटल ग्रुप द्वारे केले जाईल.
हा सराव सुरक्षित, खुली आणि मुक्त सागरी क्षेत्रे सुनिश्चित करण्याची सामायिक वचनबद्धता अधोरेखित करत आहे आणि 'भारत-यूके व्हिजन 2035' मध्ये नमूद केलेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे उदाहरण सदर करेल.

* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175166)
Visitor Counter : 5