नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
गोवा पाणीपुरवठ्यासाठी आयआरईडीएच्या 45 किलोवॅट क्षमतेच्या सौर सीएसआर प्रकल्पाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले उद्घाटन
Posted On:
04 OCT 2025 7:14PM by PIB Mumbai
केंद्रीय उर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेच्या (आयआरईडीए) च्या कार्पोरेट सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत उत्तर गोवा जिल्ह्यातील एका वॉटर पंपिंग स्टेशनवर 45 किलोवॅट क्षमतेच्या ऑन-ग्रिड सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन केले.

या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 60,000 युनिट्सची वीज निर्माण होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे पंपिंग लोडचे 100% सौरऊर्जाकरण साध्य होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सार्वजनिक जलपुरवठा प्रणालींना शाश्वतपणे कशी उर्जा देऊ शकते हे दाखविण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
आयआरईडीएचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "या उपक्रमातून आयआरईडीएच्या वित्तपुरवठ्या पलीकडे जाऊन स्वच्छ उर्जेला समाजविकासाशी जोडण्याच्या बांधिलकीची प्रचीती येते. वॉटर पंपिंग स्टेशनसारख्या सार्वजनिक सेवांचे सौरउर्जाकरण हे देशभरातील शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी एक अनुकरणीय मॉडेल ठरू शकते."

या कार्यक्रमाला आयआरईडीएच्या सीएसआर विभागाचे अधिकारी, गोवा पेयजल विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते
***
निलिमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174909)
Visitor Counter : 11