पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियाटुरिझम मुंबईने सार्वजनिक स्वच्छता उपक्रमांसह केली गांधी जयंती साजरी

Posted On: 03 OCT 2025 6:12PM by PIB Mumbai

 

महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आणि विशेष मोहीम 5.0 चा भाग म्हणून, पर्यटन मंत्रालयाचे  प्रादेशिक कार्यालय इंडियाटुरिझम मुंबईच्या वतीने 2 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) परिसराबाहेर स्वच्छता मोहीम आयोजित केली.

या उपक्रमात इंडियाटुरिझम मुंबईच्या अधिकाऱ्यांसह मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन आणि  रिझवी  कला, साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालय  तथा हॉस्पिटॅलिटी स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी  सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, खाऊगल्ली, जनरल पोस्ट ऑफिसच्या बाहेरचा परिसर  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरासह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या  मोहिमेचा प्रभाव लगेचच दिसून आला. स्वच्छता आणि सार्वजनिक जबाबदारीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आखलेल्या या मोहिमेत  सुमारे 75 जणांनी  उत्साहाने भाग घेतला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, इंडियाटूरिझम मुंबईने सर्व सहभागींना टी-शर्ट, कॅप्स आणि अल्पोपहाराचे वाटप केले.

या उपक्रमाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता, ई कचरा व्यवस्थापन, नोंदींचे व्यवस्थापन आणि एकंदरीत कार्यालय किंवा कार्यस्थळ सुधारणा या दृष्टीने देशभर राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहीम 5.0 चा आरंभ झाला.

***

गोपाळ चिप्पलकट्टी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2174602) अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein: English