कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विपणन हंगाम 2026-27 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 01 OCT 2025 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम 2026-27 मध्ये सर्व प्रमुख रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली.

उत्पादकांना त्यांच्या शेत मालासाठी योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने विपणन हंगाम 2026-27 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केली आहे. करडईसाठी किमान आधारभूत किमतीत  600 रुपये प्रति क्विंटल  सर्वाधिक वाढ जाहीर करण्यात आली आहे,  त्यापाठोपाठ कडधान्य (मसूर) साठी 300 रुपये प्रति क्विंटल दराने किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ जाहीर करण्यात आली. रॅपसीड आणि मोहरी च्या एमएसपी मध्ये  प्रति क्विंटल 250 रुपये, हरभरा प्रति क्विंटल 225 रुपये,  बार्ली प्रति क्विंटल 170 रुपये  आणि गव्हाच्या एमएसपी मध्ये प्रति क्विंटल 160  रुपयांची वाढ झाली आहे.

विपणन हंगाम 2026-27मधील सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमती

(रु. प्रति क्विंटल)

Crops

MSP RMS 2026-27

Cost*of Production RMS

2026-27

Margin over cost

(in percent)

MSP RMS 2025-26

Increase in MSP

(Absolute)

Wheat

2585

1239

109

2425

160

Barley

2150

1361

58

1980

170

Gram

5875

3699

59

5650

225

Lentil (Masur)

7000

3705

89

6700

300

Rapeseed & Mustard

6200

3210

93

5950

250

Safflower

6540

4360

50

5940

600

*खर्चाचा संदर्भ यात शेतमजुरी, बैलांची मजुरी/यंत्रांचा खर्च, भाडेतत्वावरील जमिनीचे भाडे, बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन खर्च, अवजारे आणिशेतीच्या इमारतींवर घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप चालवण्यासाठी डीझेल/वीज हा सर्व खर्च, आणि विविध  खर्च आणि कुटुंबाचे श्रम हा सर्व खर्च समाविष्ट आहे.

विपणन हंगाम 2026-27 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मधील, देशभरातील पिकांच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या घोषणेला अनुसरून आहे.

देशभरातील भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित फरक, गव्हासाठी 109 टक्के, त्यापाठोपाठ रॅपसीड आणि मोहरी 93 टक्के, मसूरसाठी  89 टक्के, हरभरा 59 टक्के, बार्ली 58 टक्के, आणि करडईसाठी 50 टक्के इतका आहे.

रब्बी पिकांच्या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला फायदेशीर भाव मिळेल आणि पिकांमधील विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2173833) Visitor Counter : 8