वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि आत्मरक्षणावर भारताचा भर : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2025 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
भारताचा भर पुरवठा साखळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आत्मनिर्भरता , मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आत्मविश्वास आणि भारताच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आत्मरक्षण यावर आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या 30व्या भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) भागीदारी शिखर परिषद पूर्व कार्यक्रमात सांगितले.मंत्री म्हणाले की, उत्कृष्ट भागीदाऱ्या तंत्रज्ञान, विश्वास, व्यापार, प्रतिभा आणि परंपरा या पायांवर उभ्या राहतात.
आत्मनिर्भरता म्हणजे जागतिक धक्के सहन करू शकतील अशा पुरवठा व मूल्य साखळ्या निर्माण करणे, व्यापाराचे हत्यारीकरण टाळणे आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकी पूर्ण करण्यास भारत नेहमी सक्षम राहावा हे सुनिश्चित करणे.
आत्मविश्वास म्हणजे आज भारत जगाशी सामर्थ्यपूर्ण भूमिकेतून संवाद साधतो, महत्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आत्मविश्वास बाळगतो आणि जागतिक अर्थव्यवस्थेत समसमान भागीदार म्हणून कार्य करतो.
आत्मरक्षण म्हणजे भारतीयांचे हित जपणे आणि जी20 शिखर परिषदेच्या “वसुधैव कुटुंबकम् – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” या संकल्पनेप्रमाणे संपूर्ण मानवजातीच्या मोठ्या हितांचे संरक्षण करणे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
गोयल यांनी पुढे सांगितले की, अलीकडील जीएसटी प्रणालीतील सुधारणा प्रक्रियांची सुलभता वाढवतील, ग्राहकांवरील कराचा बोजा कमी करतील आणि भारताच्या उपभोगाधारित वाढीस मोठा चालना देतील.
आगामी 30वी सीआयआय भागीदारी शिखर परिषद विशाखापट्टणम येथे होत असून, भारत आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसह अधिक मजबूत आणि लवचिक सहकार्य उभारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, सीआयआय ही संस्था भारत आणि जागतिक समुदाय यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करत राहील त्यांनी नमूद केले.
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2173403)
आगंतुक पटल : 25