सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ऑगस्ट 2025 मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने 4.0%ची वाढ नोंदवली
Posted On:
29 SEP 2025 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
- खाण क्षेत्राच्या 6% वृद्धीसह ऑगस्ट 2025 मध्ये अखिल भारतीय औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) गेल्या वर्षापेक्षा 4.0% वाढ नोंदवली.
- उत्पादन क्षेत्रामध्ये “मुलभूत धातूंचे उत्पादन” 12.2% आणि “मोटर वाहने, ट्रेलर्स आणि सेमी-ट्रेलर्स यांचे उत्पादन” 9.8% झाल्यामुळे या क्षेत्राने उत्तम वाढ नोंदवली.
सुधारित दिनदर्शिकेनुसार, आता औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज यापुढे दर महिन्याच्या 28 तारखेला (किंवा 28 तारखेला सुट्टीचा दिवस असेल तर त्यानंतरच्या कामाच्या दिवशी) जाहीर केला जाईल. हा निर्देशांक स्त्रोत संस्थांकडून मिळालेल्या आकडेवारीसोबत संकलित केला जातो. आणि या संस्था उत्पादक कारखाने/ आस्थापनांकडून हा डाटा मिळवतात. यापुढे जारी करण्यात येणाऱ्या त्वरित अंदाजांमध्ये आयआयपीच्या सुधारणाविषयक धोरणाला अनुसरून सुधारणा करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे:
- ऑगस्ट 2025 या महिन्यासाठीचा आयआयपी वृद्धी दर 4.0 टक्के राहिला. जुलै 2025 मध्ये हाच दर 3.5 टक्के (त्वरित अंदाज) इतका होता.
- ऑगस्ट 2025 या महिन्यात खाण, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचे वृद्धी दर अनुक्रमे 6.0 टक्के, 3.8 टक्के आणि 4.1 टक्के राहिले.
- आयआयपीचा त्वरित अंदाज ऑगस्ट 2025 या महिन्यात 151.7 इतका राहिला तर, ऑगस्ट 2024 मध्ये तो 145.8 इतका होता.
- उत्पादन क्षेत्रांतर्गत दोन अंकी स्तरावर एनआयसी असलेल्या 23 उद्योग समूहांपैकी 10 समूहांनी ऑगस्ट 2024 महिन्यातील कामगिरीच्या तुलनेत ऑगस्ट 2025 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे.
- वापरावर आधारित वर्गीकरणानुसार, ऑगस्ट 2025 मध्ये प्राथमिक वापराच्या वस्तूंसाठीचा निर्देशांक 148.9, भांडवली वस्तूंसाठीचा निर्देशांक 112.1, मध्यवर्ती प्रकारच्या वस्तूंसाठीचा निर्देशांक 170.4 आणि पायाभूत सुविधांशी संबंधित साहित्य / बांधकाम साहित्यासाठीचा निर्देशांक 200.8 इतका नोंदवला गेला. तसेच, ग्राहकोपयोगी वस्तू आणि बिगर ग्राहकोपयोगी वस्तूंचे निर्देशांक अनुक्रमे 134.4 आणि 132.8 इतके राहिले.
- वापरावर आधारित वर्गीकरणानुसार, ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या आयआयपीमधील वृद्धीत प्राथमिक वापराच्या वस्तू, पायाभूत सुविधा/ बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू आणि मध्यवर्ती प्रकारच्या वस्तू ही तीन प्रमुख योगदानकर्ती क्षेत्रे आहेत.
- आयआयपीचे गेल्या 13 महिन्यांतील मासिक निर्देशांक आणि वृद्धी दर (टक्क्यांमध्ये)

- ऑगस्ट 2025 मधील आयआयपीच्या त्वरित अंदाजासोबतच, स्त्रोत संस्थांकडून प्राप्त झालेल्या अद्ययावत आकडेवारीच्या मदतीने, जुलै 2025 च्या निर्देशांकांमध्ये अंतिम सुधारणा करण्यात आली आहे.
- ऑगस्ट 2025 मधील त्वरित अंदाज आणि जुलै 2025 साठी केलेली अंतिम सुधारणा अनुक्रमे 90.96 टक्के आणि 92.99 टक्के भारित प्रतिसाद दरांसह संकलित करण्यात आली आहे.
- क्षेत्रीय स्तरावरील, राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाची (NIC-2008) 2 अंकी पातळी, आणि वापरावर आधारित वर्गीकरणाद्वारे प्राप्त झालेले ऑगस्ट 2025 या महिन्यासाठीच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या त्वरित अंदाजांचे तपशील अनुक्रमे निवेदन क्र. I, II आणि III मध्ये दिले आहेत. तसेच, वापरकर्त्यांना औद्योगिक क्षेत्रातील बदल समजून घेता यावेत यासाठी, निवेदन IV मध्ये उद्योग समूह (एनआयसी-2008 मधील 2 अंकी स्तरानुसार) आणि विविध क्षेत्रांद्वारे प्राप्त झालेले गेल्या 13 महिन्यांतील महिना-निहाय निर्देशांक दिले आहेत.
- सप्टेंबर 2025 महिन्यासाठीच्या निर्देशांकाची आकडेवारी मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात येईल.
टीप:-
- हे प्रसिद्धीपत्रक (इंग्रजी तसेच हिंदी भाषांतील आवृत्ती) मंत्रालयाच्या http://www.mospi.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
- आयआयपीशी संबंधित तपशीलवार माहिती https://mospi.gov.in/iip तसेच https://esankhyiki.mospi.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
Annexures आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172879)
Visitor Counter : 3