अणुऊर्जा विभाग
माही बांसवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2025 5:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 26 सप्टेंबर 2025 रोजी राजस्थानमधील बांसवाडा येथील माही बन्सवाडा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन केले.
भारतीय अणुऊर्जा महामंडळाची उपकंपनी असलेल्या अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड (अश्विनी) या कंपनीद्वारे या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ या कंपनीत सहभागीदार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दोन कंपन्यांकडून संयुक्तपणे उभारला जात असलेला हा देशातील पहिलाच अणुऊर्जा प्रकल्प आहे.
माही बांसवाडा प्रकल्पासाठी भारतीय अणुऊर्जा महामंडळाने प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या स्वदेशी बनावटीच्या, दाबयुक्त जड पाण्याचा वापर असलेल्या चार अणुभट्ट्या विकसित केल्या आहेत. एका टप्प्यात दोन अशा रितीने एकंदर 42000 कोटी रुपये खर्चाच्या माही बांसवाडा 1 आणि 2 (2*700 मेगावॅट) आणि माही बन्सवाडा 3 आणि 4 (2*700 मेगावॅट) अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत.
***
शैलेश पाटील / सुरेखा जोशी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2171990)
आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English