भूविज्ञान मंत्रालय
मिशन मौसमअंतर्गत भारतात दोन डायरेक्ट ब्रॉडकास्ट नेटवर्क (डीबीनेट) स्टेशन्स स्थापण्यासाठी एनसीएमआरडब्ल्यूएफ आणि एनएसआयएल यांच्यामध्ये सामंजस्य करार; हवामान अंदाज आणि जागतिक हवामान देखरेख व्यवस्था होणार अधिक मजबूत
Posted On:
23 SEP 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय मध्यम अवधी हवामान अंदाज केंद्राने (एनसीएमआरडब्ल्यूएफ) आज नवी दिल्लीतील पृथ्वी भवन येथे अंतराळ विभागाची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) सोबत एक सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मिशन मौसम प्रकल्पाचा भाग म्हणून एक दिल्ली/एनसीआरमध्ये आणि दुसरे चेन्नई येथे असे दोन डायरेक्ट ब्रॉडकास्ट नेटवर्क स्टेशन्स स्थापन करणे हे आहे.
डीबीनेट ही एक जागतिक परिचालन व्यवस्था आहे जी ‘लो अर्थ ऑर्बिट’ (LEO) उपग्रहांद्वारे उपग्रह डेटाच्या वास्तविक वेळेतील संपादनासाठी डिझाइन केलेली आहे. न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन (NWP) मध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि हवामान अंदाज, चक्रीवादळ देखरेख आणि हवामान संशोधनासह व्यापक अनुप्रयोगांना सहाय्य पुरवते.
प्रमुख फायदे:
• एनडब्ल्यूपीसाठी समयसूचकता : डीबीनेटचा प्राथमिक फायदा म्हणजे LEO उपग्रह डेटाची वास्तविक वेळेतील उपलब्धता, जी उच्च-रिझोल्यूशन, कमी ते मध्यम अवधीचा हवामान अंदाज तयार करण्यासाठी आवश्यक आहे.
• कमी डेटा विलंब : पारंपरिक उपग्रह डेटा अधिग्रहण पद्धतींमध्ये मध्यवर्ती ग्राउंड स्टेशनवर विलंबित ट्रान्समिशन समाविष्ट असते, त्याउलट डीबीनेट उपग्रह ओव्हरहेडमधून जात असताना थेट डेटा कॅप्चर करते, विलंबाच्या समस्यांवर मात करते आणि जलद डेटा वितरण सक्षम करते.
• जलद प्रक्रिया: एनसीएमआरडब्ल्यूएफ उपग्रह ओव्हरपासच्या 5 मिनिटांच्या आत संपूर्ण डेटा प्रक्रिया साखळी पूर्ण करेल, ज्यामुळे सर्व-प्रकारच्या अंदाजासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एनडब्ल्यूपी मॉडेल्समध्ये या डेटासेटचे वेळेवर अंतर्ग्रहण सुनिश्चित होईल.
• जागतिक योगदान: यामुळे जागतिक डीबीनेट कव्हरेज सुधारण्यात आणि 30 मिनिटांमध्ये ईओएस उपग्रह डेटाची आंतरराष्ट्रीय उपलब्धता वाढविण्यात भारताच्या योगदानाला बळ मिळेल.
या उपक्रमाद्वारे, भारत प्रादेशिक आणि जागतिक हवामान अंदाज क्षमता वाढविण्याच्या आणि हवामान अंदाज आणि हवामान देखरेखीतील आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, ज्यामुळे आपत्ती जोखीम कमी होते.


सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170368)
Visitor Counter : 4