सांस्कृतिक मंत्रालय
रशियातील काल्मीकिया येथे बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे होणार ‘प्रथम प्रदर्शन’
Posted On:
22 SEP 2025 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2025
नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातील बुद्धांचे पवित्र अवशेष पहिल्या प्रदर्शनासाठी रशियाच्या काल्मीकिया येथे नेण्यात येणार आहेत. या प्रवासामध्ये पवित्र अस्थिंबरोबर वरिष्ठ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भिक्षूंचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ जाणार आहे. हे बौध्द भिक्षू या प्रदेशातील प्रामुख्याने बौद्ध लोकांना आशीर्वाद देतील आणि प्रार्थना करतील.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ (आयबीसी), राष्ट्रीय संग्रहालय, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसीए) यांच्या सहकार्याने, 24 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान रशियाच्या काल्मीकियाची राजधानी एलिस्टा येथे होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध मंचावर राष्ट्रीय संग्रहालयामध्ये जतन करून ठेवलेल्या पवित्र बुद्ध अवशेषांचे प्रदर्शन प्रथमच आयोजित केले जात आहे.
"नवीन सहस्राब्दीतील बौद्ध धर्म" अशी संकल्पना असलेल्या या मंचाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारतातील शाक्यमुनींचे पवित्र अवशेष यांचे प्रदर्शन, आयबीसी आणि राष्ट्रीय संग्रहालयाने आयोजित केलेली चार प्रदर्शने आणि तीन विशेष शैक्षणिक व्याख्याने आहेत. यावेळी पवित्र अवशेष काल्मीकियाची राजधानी एलिस्टा येथील मुख्य बौद्ध मठात ठेवण्यात येतील, ज्याला "शाक्यमुनी बुद्धांचे सुवर्ण निवासस्थान" असेही म्हणतात.
यापूर्वी, काल्मीकिया येथील भिक्षूंच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भारताला भेट दिली होती आणि त्यांनी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना बुद्धांच्या पवित्र अवशेषांना त्यांच्या गावी पूजन करण्यासाठी आणि आशीर्वादासाठी नेण्याची विनंती केली होती.
या प्रसंगी दोन सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी देखील केली जाईल. यापैकी एक बौद्ध रशियाचे केंद्रीय आध्यात्मिक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ यांच्यामध्ये करार होईल आणि दुसरा सामंजस्य करार नालंदा विद्यापीठाबरोबर होणार आहे.
पवित्र अवशेष राष्ट्रीय संग्रहालयातून मोठ्या श्रद्धेने वरिष्ठ भिक्षू पूर्ण धार्मिक पावित्र्य आणि राजशिष्टाचाराचे पालन करून भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने काल्मीकिया येथे नेणार आहेत.

Votive stupa showing life scenes of Gotama Buddha
Ca. 10th Century CE
Pala period, Nalanda, Bihar
Bronze, Width:30, Height:20 cm
Acc. No. 49.129
(National Museum Collection)
Artefact to be displayed in the exhibition hall in Kalmykia, Russia
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169621)
Visitor Counter : 8